S M L

मुंबईत भाजपचं मंथन

25 मेमुंबईत सुरु असलेली भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीचा आज शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी भाजपच्या सर्व नेत्यांनी हजरी लावली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा आज या बैठकीत सहभागी झाले. येडीयुरप्पांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी थेट पाठिंबा दिला आहे. तर काल गुरुवारी संजय जोशी यांची विकेट घेतल्यानंतर दाखल झालेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय कार्यकारिणीत भाषण करणार आहेत. पण, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी मात्र उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे अडवाणी नाराज असल्याची चर्चा आहे. पण अडवाणी नाराज नाहीत असं भाजपनं स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे नितीन गडकरी यांची दुसर्‍यांदा राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे पक्षात नाराजी असल्याची कुजबुज सुरु आहे. पण असं काही नसल्याचं दावा निर्मला सीतारामन यांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2012 11:36 AM IST

मुंबईत भाजपचं मंथन

25 मे

मुंबईत सुरु असलेली भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीचा आज शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी भाजपच्या सर्व नेत्यांनी हजरी लावली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा आज या बैठकीत सहभागी झाले. येडीयुरप्पांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी थेट पाठिंबा दिला आहे. तर काल गुरुवारी संजय जोशी यांची विकेट घेतल्यानंतर दाखल झालेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय कार्यकारिणीत भाषण करणार आहेत. पण, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी मात्र उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे अडवाणी नाराज असल्याची चर्चा आहे. पण अडवाणी नाराज नाहीत असं भाजपनं स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे नितीन गडकरी यांची दुसर्‍यांदा राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे पक्षात नाराजी असल्याची कुजबुज सुरु आहे. पण असं काही नसल्याचं दावा निर्मला सीतारामन यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2012 11:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close