S M L

पेट्रोलवरचा व्हॅट कमी करणं अशक्य - मुख्यमंत्री

25 मेसध्या राज्य दुष्काळी संकटातून जात आहे आणि दुष्काळासाठी नियमित निधी खर्च होतोय. त्यामुळे अशा स्थितीत पेट्रोलवरचे कर कमी करता येणं शक्य नसल्याचं असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रात पेट्रोलवर 28 टक्के व्हॅट आहे. पण तो कमी होणार नाही असं सांगत मुख्यमंत्र्यांनी पेट्रोलचे वाढीव दर कमी करायला एकप्रकारे नकार दिला आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्यामुळे दोन दिवसांपुर्वी पेट्रोलच्या किंमतीत 7.50 रुपयांची विक्रमी वाढ करुन महागाईच्या आगीत होरपाळणार्‍या सर्वसामान्याचं पुरतं कंबरड मोडण्यात आलंय. आजपर्यंत कधी नव्हे इतक्या मोठ्याप्रमाणावर झालेली दरवाढ पाहून सर्वसामान्यांनी संताप व्यक्त करत आहे. राज्यात ठिकठिकाणी दरवाढीच्याविरोधात आंदोलन केली जात आहे. महाराष्ट्राच्या शेजारील छोट्याशा गोवा राज्यात पेट्रोल सर्वाधिक स्वस्त मिळतं आहे. मागिल महिन्यात गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी व्हट हटवून पेट्रोल 11 रुपयांनी स्वस्त केलं. याउलट महाराष्ट्रात सर्वाधिक 28 टक्के व्हॅट दिला जात आहे. गोव्याप्रमाणे व्हॅट कमी करुन पेट्रोलच्या किंमती कमी होऊ शकतात अशी शक्यता होती. याबद्दल दोन दिवसांपुर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्राशी चर्चा करणार असं सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे सर्वसामान्य आशेचा किरण दिसला मात्र आज मुख्यमंत्री दरवाढ कमी करायला नकार देत व्हॅट कमी होऊ शकत नाही असं स्पष्ट करुन टाकलं. राज्य दुष्काळ परिस्थितीचा सामना करत आहे. दुष्काळासाठी अगोदरच 700 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे व्हॅट कमी करून सरकारी तिजोरीवर अजून बोजा देत येत नाही असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2012 12:38 PM IST

पेट्रोलवरचा व्हॅट कमी करणं अशक्य - मुख्यमंत्री

25 मे

सध्या राज्य दुष्काळी संकटातून जात आहे आणि दुष्काळासाठी नियमित निधी खर्च होतोय. त्यामुळे अशा स्थितीत पेट्रोलवरचे कर कमी करता येणं शक्य नसल्याचं असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रात पेट्रोलवर 28 टक्के व्हॅट आहे. पण तो कमी होणार नाही असं सांगत मुख्यमंत्र्यांनी पेट्रोलचे वाढीव दर कमी करायला एकप्रकारे नकार दिला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्यामुळे दोन दिवसांपुर्वी पेट्रोलच्या किंमतीत 7.50 रुपयांची विक्रमी वाढ करुन महागाईच्या आगीत होरपाळणार्‍या सर्वसामान्याचं पुरतं कंबरड मोडण्यात आलंय. आजपर्यंत कधी नव्हे इतक्या मोठ्याप्रमाणावर झालेली दरवाढ पाहून सर्वसामान्यांनी संताप व्यक्त करत आहे. राज्यात ठिकठिकाणी दरवाढीच्याविरोधात आंदोलन केली जात आहे. महाराष्ट्राच्या शेजारील छोट्याशा गोवा राज्यात पेट्रोल सर्वाधिक स्वस्त मिळतं आहे. मागिल महिन्यात गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी व्हट हटवून पेट्रोल 11 रुपयांनी स्वस्त केलं. याउलट महाराष्ट्रात सर्वाधिक 28 टक्के व्हॅट दिला जात आहे. गोव्याप्रमाणे व्हॅट कमी करुन पेट्रोलच्या किंमती कमी होऊ शकतात अशी शक्यता होती. याबद्दल दोन दिवसांपुर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्राशी चर्चा करणार असं सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे सर्वसामान्य आशेचा किरण दिसला मात्र आज मुख्यमंत्री दरवाढ कमी करायला नकार देत व्हॅट कमी होऊ शकत नाही असं स्पष्ट करुन टाकलं. राज्य दुष्काळ परिस्थितीचा सामना करत आहे. दुष्काळासाठी अगोदरच 700 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे व्हॅट कमी करून सरकारी तिजोरीवर अजून बोजा देत येत नाही असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2012 12:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close