S M L

पाणी प्रश्नी नागरीकांनी केली अभियंत्याला बेदम मारहाण

26 मेनांदेडमध्ये पाण्यासाठी नागरिकांच्या संतापाचा उद्रेक आज एका अधिकार्‍यांच्या जीवावर बेतला. दोन दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही आणि पाणीपुरवठा का होत नाही याचे उत्तर सुद्धा अधिकारी देत नसल्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी अक्षरश: एका मनपाच्या पाणीपुरवठा अभियंत्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. याप्रकरणी नांदेडच्या इतवारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपासून प्यायला पाणी नाही, अधिकारी उत्तर देत नाही याचा जाब विचारण्यासाठी आज सकाळी नागरिकांनी महापालिकेचे पाणीपुरवठा विभाग गाठले. आणि अभियंत्याला घेराव घातला. भांबवलेल्या अभियंत्याने लोकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण संतापलेल्या नागरिकांनी त्यांनाच बेदम मारहाण करायला सुरुवात केली. जवळपास 15 मिनिट चाललेला हा राडा अधिकारी बेशुध्द पडल्यावर थांबला. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन अभियंत्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी अज्ञात मारेकर्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 26, 2012 02:57 PM IST

पाणी प्रश्नी नागरीकांनी केली अभियंत्याला बेदम मारहाण

26 मे

नांदेडमध्ये पाण्यासाठी नागरिकांच्या संतापाचा उद्रेक आज एका अधिकार्‍यांच्या जीवावर बेतला. दोन दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही आणि पाणीपुरवठा का होत नाही याचे उत्तर सुद्धा अधिकारी देत नसल्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी अक्षरश: एका मनपाच्या पाणीपुरवठा अभियंत्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. याप्रकरणी नांदेडच्या इतवारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपासून प्यायला पाणी नाही, अधिकारी उत्तर देत नाही याचा जाब विचारण्यासाठी आज सकाळी नागरिकांनी महापालिकेचे पाणीपुरवठा विभाग गाठले. आणि अभियंत्याला घेराव घातला. भांबवलेल्या अभियंत्याने लोकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण संतापलेल्या नागरिकांनी त्यांनाच बेदम मारहाण करायला सुरुवात केली. जवळपास 15 मिनिट चाललेला हा राडा अधिकारी बेशुध्द पडल्यावर थांबला. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन अभियंत्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी अज्ञात मारेकर्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2012 02:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close