S M L

'रेन वॉटर हार्वेस्टिंग'मुळे पाणीटंचाईच टेन्शन दूर

मनोज देवकर, ठाणे26 मेएकीकडे महाराष्ट्रात दुष्काळानं सरकारची डोकेदुखी वाढवली आहे. तर दुसरीकडे ठाण्यातील रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्पामुळे पाण्याचा तुटवडा फार जाणवत नाही. ठाणे महानगरपालिकेनं नवीन सोसायटींना हा प्रकल्प बंधनकारक केल्यामुळं पाण्याचं योग्य नियोजन शक्य झालंय. ठाण्याच्या विकास कॉम्प्लेक्स मध्ये राहणारे आंबेकर कुटुंबीय, 2004 पासून त्यांनी आपल्या सोसयटीत रेन वॉटर हार्वेस्टींग हा प्रकल्प लोकांना समजावुन सांगितला आणि त्यावर अंमलबजावणी केली. यासाठी त्यांना साठ हजार रुपयांचा खर्च आला होता. पण आज त्यांच्या या उपक्रमामुळे 24 तास पाणी उपलब्ध राहतं. सुरुवातीला हळुहळु पाण्याची पातळी वाढल्यावर त्यांच्या रेन वॉटर हार्वेस्टींगप्रकल्पामुळे सर्व नागरीकांना पिण्याच्या पाण्याव्यतीरिक्त इतर आवश्यकतेसाठी महापालिकेच्या पाण्याची आवश्यकता नसते. पावसाळ्यातील पावसाचे पाणी साठवुन उद्यान आणि वापरण्याचे पाणी त्यांना मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहे. रेन वॉटर हार्वेस्टींग हा प्रकल्प सर्वांनी राबवावा यासाठी प्रयत्न करणारे सामाजिक कार्यकर्ते या पाण्याच्या उपलब्धतेवर समाधान व्यक्त करत आहेत. महानगरपालिका प्रशासनानं सर्व नविन बांधकामांसाठी रेन वॉटर हार्वेस्टींग बंधनकारक केल्यानं शहरातील पाण्याची मागणी ही कमी झाली आहे. आणि रेन वॉटर हार्वेस्टींग योजनेचा वापर सर्व महाराष्ट्रात करावा असा संदेस महानगरपालीकेकडून होतोय. ठाण्यातील 300 मोठ्या सोसायटींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टींग हा प्रकल्प राबवला जातोय त्यानं पाण्याच्या टंचाईमुळे होरपळणार्‍या महाराष्ट्राला नविन संजीवनी मिळतेय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 26, 2012 04:43 PM IST

'रेन वॉटर हार्वेस्टिंग'मुळे पाणीटंचाईच टेन्शन दूर

मनोज देवकर, ठाणे

26 मे

एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळानं सरकारची डोकेदुखी वाढवली आहे. तर दुसरीकडे ठाण्यातील रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्पामुळे पाण्याचा तुटवडा फार जाणवत नाही. ठाणे महानगरपालिकेनं नवीन सोसायटींना हा प्रकल्प बंधनकारक केल्यामुळं पाण्याचं योग्य नियोजन शक्य झालंय.

ठाण्याच्या विकास कॉम्प्लेक्स मध्ये राहणारे आंबेकर कुटुंबीय, 2004 पासून त्यांनी आपल्या सोसयटीत रेन वॉटर हार्वेस्टींग हा प्रकल्प लोकांना समजावुन सांगितला आणि त्यावर अंमलबजावणी केली. यासाठी त्यांना साठ हजार रुपयांचा खर्च आला होता. पण आज त्यांच्या या उपक्रमामुळे 24 तास पाणी उपलब्ध राहतं. सुरुवातीला हळुहळु पाण्याची पातळी वाढल्यावर त्यांच्या रेन वॉटर हार्वेस्टींगप्रकल्पामुळे सर्व नागरीकांना पिण्याच्या पाण्याव्यतीरिक्त इतर आवश्यकतेसाठी महापालिकेच्या पाण्याची आवश्यकता नसते. पावसाळ्यातील पावसाचे पाणी साठवुन उद्यान आणि वापरण्याचे पाणी त्यांना मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहे.

रेन वॉटर हार्वेस्टींग हा प्रकल्प सर्वांनी राबवावा यासाठी प्रयत्न करणारे सामाजिक कार्यकर्ते या पाण्याच्या उपलब्धतेवर समाधान व्यक्त करत आहेत. महानगरपालिका प्रशासनानं सर्व नविन बांधकामांसाठी रेन वॉटर हार्वेस्टींग बंधनकारक केल्यानं शहरातील पाण्याची मागणी ही कमी झाली आहे. आणि रेन वॉटर हार्वेस्टींग योजनेचा वापर सर्व महाराष्ट्रात करावा असा संदेस महानगरपालीकेकडून होतोय.

ठाण्यातील 300 मोठ्या सोसायटींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टींग हा प्रकल्प राबवला जातोय त्यानं पाण्याच्या टंचाईमुळे होरपळणार्‍या महाराष्ट्राला नविन संजीवनी मिळतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2012 04:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close