S M L

कोलकाता जितबो रे...

27 मेआयपीएल पाचच्या हंगामात कोलकाता नाईट राईटसने इतिहास रचला आहे. चेन्नई सुपर किंग्जला धोबीपछाड देत कोलकाता किंग ठरली आहे. चेन्नईने दिलेल्या 190 धावांचा पाठलाग करत कोलकाताने संयमी आणि चोख बॅटिंग करत चषकावर आपले नाव कोरले आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं चेन्नई सुपर किंग्जचा 5 विकेटनं पराभव करत आयपीएलच्या पाचव्या हंगामाचं जेतेपद पटकावलं. तर धोणीच्या चेन्नई सुपर किंग्जचं हॅट्‌ट्रीकचं स्वप्न मात्र हुकलं आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगतदार ठऱलेल्या मॅचमध्ये मनोज तिवारीनं फोर मारत विजयावर शिक्कामोर्तब केलं. सुरेश रैना आणि मायकेल हसीच्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईनं कोलकातासमोर विजयासाठी 191 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. याला उत्तर देताना कोलकाताची सुरुवात खराब झाली. फॉर्मात असलेला कॅप्टन गौतम गंभीर झटपट आऊट झाला. पण याचा फारसा परिणाम टीमवर झाला नाही. मनविंदर बिस्ला आणि जॅक कॅलिसनं दुसर्‍या विकेटसाठी 136 रन्सची पार्टनरशिप करत टीमला विजयाच्या मार्गावर आणलं. बिस्ला 89 रन्सवर आऊट झाला. तर कॅलिस 69 रन्सवर पॅव्हेलिअनमध्ये परतला. पण यानंतर मनोज तिवारीनं जबाबदारीनं बॅटिंग करत टीमला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. ख्रिस गेल ऑरेंज कॅपचा मानकरी बंगलोर रॉयलचा धडाकेबाज बॅट्समन ख्रिस गेल ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. बंगलोर रॉयलला लीगमध्ये बाहेर पडावं लागलं असलं तरी ख्रिस गेलनं या हंगामात आपल्या बॅटचा दणका दाखवला. खरंतर राजस्थान रॉयल्सच्या अजिंक्य रहाणेनं स्पर्धेवर सुरुवातीपासून वर्चस्व राखलं, पण अंतिम टप्प्यात तो मागे पडला. ख्रिस गेल, गौतम गंभीर आणि शिखर धवननं या शर्यतीत चुरस निर्माण केली. पण यात बाजी मारली ती ख्रिस गेलनं पर्पल कॅपच्या शर्यतीत दिल्लीच्या मॉर्न मॉर्केलने बाजी मारली आहे. मॉर्केलनं 16 ओव्हरमध्ये तब्बल 25 विकेट घेतल्या. खरं तर कोलकाता नाईट रायडर्सचा स्पीन बॉलर सुनील नरिनला सर्वाधिक विकेट घेण्याची चांगली संधी होती. नरिननं 14 मॅचमध्ये 24 विकेट घेतल्या होत्या आणि पण फायनलमध्ये त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्यामुळे त्याला दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावं लागलंय. तर मुंबई इंडियन्सचा लसिथ मलिंगा 22 विकेटसह तिसर्‍या क्रमांकावर आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 27, 2012 06:23 PM IST

कोलकाता जितबो रे...

27 मे

आयपीएल पाचच्या हंगामात कोलकाता नाईट राईटसने इतिहास रचला आहे. चेन्नई सुपर किंग्जला धोबीपछाड देत कोलकाता किंग ठरली आहे. चेन्नईने दिलेल्या 190 धावांचा पाठलाग करत कोलकाताने संयमी आणि चोख बॅटिंग करत चषकावर आपले नाव कोरले आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं चेन्नई सुपर किंग्जचा 5 विकेटनं पराभव करत आयपीएलच्या पाचव्या हंगामाचं जेतेपद पटकावलं.

तर धोणीच्या चेन्नई सुपर किंग्जचं हॅट्‌ट्रीकचं स्वप्न मात्र हुकलं आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगतदार ठऱलेल्या मॅचमध्ये मनोज तिवारीनं फोर मारत विजयावर शिक्कामोर्तब केलं. सुरेश रैना आणि मायकेल हसीच्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईनं कोलकातासमोर विजयासाठी 191 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. याला उत्तर देताना कोलकाताची सुरुवात खराब झाली. फॉर्मात असलेला कॅप्टन गौतम गंभीर झटपट आऊट झाला. पण याचा फारसा परिणाम टीमवर झाला नाही. मनविंदर बिस्ला आणि जॅक कॅलिसनं दुसर्‍या विकेटसाठी 136 रन्सची पार्टनरशिप करत टीमला विजयाच्या मार्गावर आणलं. बिस्ला 89 रन्सवर आऊट झाला. तर कॅलिस 69 रन्सवर पॅव्हेलिअनमध्ये परतला. पण यानंतर मनोज तिवारीनं जबाबदारीनं बॅटिंग करत टीमला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

ख्रिस गेल ऑरेंज कॅपचा मानकरी

बंगलोर रॉयलचा धडाकेबाज बॅट्समन ख्रिस गेल ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. बंगलोर रॉयलला लीगमध्ये बाहेर पडावं लागलं असलं तरी ख्रिस गेलनं या हंगामात आपल्या बॅटचा दणका दाखवला. खरंतर राजस्थान रॉयल्सच्या अजिंक्य रहाणेनं स्पर्धेवर सुरुवातीपासून वर्चस्व राखलं, पण अंतिम टप्प्यात तो मागे पडला. ख्रिस गेल, गौतम गंभीर आणि शिखर धवननं या शर्यतीत चुरस निर्माण केली. पण यात बाजी मारली ती ख्रिस गेलनं पर्पल कॅपच्या शर्यतीत दिल्लीच्या मॉर्न मॉर्केलने बाजी मारली आहे. मॉर्केलनं 16 ओव्हरमध्ये तब्बल 25 विकेट घेतल्या. खरं तर कोलकाता नाईट रायडर्सचा स्पीन बॉलर सुनील नरिनला सर्वाधिक विकेट घेण्याची चांगली संधी होती. नरिननं 14 मॅचमध्ये 24 विकेट घेतल्या होत्या आणि पण फायनलमध्ये त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्यामुळे त्याला दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावं लागलंय. तर मुंबई इंडियन्सचा लसिथ मलिंगा 22 विकेटसह तिसर्‍या क्रमांकावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 27, 2012 06:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close