S M L

सुट्टी मागणार्‍या मुलांवर अमानुष अत्याचार

27 मेलातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये कार सर्व्हिसिंग सेंटरमध्ये बालकामगाराला अमानवीय पद्धतीने गंभीर दुखापत करण्याची घटना घडली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्य दिवशी म्हणजे 14 एप्रिलला त्यानी सुट्टी मागितली. पण त्याला सुट्टी न दिल्यानं तो निघून जात असताना इथं काम करणार्‍या जावेद पटेल आणि सलीम पटेल या दोन मेकॅनिकनी एअर कंम्प्रेसरने त्याच्या गुदवारात हवा भरली. त्यामुळे त्याचे पोट फुगले आतडं फाटलं. या मुलाचे पालक हे वीट भट्टी कामगार आहेत. पोलिसांनी पालकांची तक्रार दाखल करुन घेतली नाही. त्यानंतर त्यांनी मुलाला उपचारासाठी लातूरच्या शासकीय हॉस्पिटल गाठले. पण गुन्हा दाखल नसल्याने आम्ही मुलाला दाखल करु शकत नाही असे सांगितले. पोलिसांनी 1 मे रोजी गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या सोबतच पेट्रोलपंप मालकाविरुद्ध ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करवा आणि फरार असलेल्या दुसर्‍या मालकाला अटक करण्याची मागणी मानवी हक्क अभियानचे अध्यक्ष एकनाथ आव्हाड यांनी केली आहे. या मागणीसाठी उदगीरमध्ये श्रमिक विकास संघटना आणि मानवी हक्क अभियान 1 जून रोजी उदगीर येथे मोर्चा काढणार आहे. परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला उपचाराचा खर्च परवडत नाही. त्यामुळे प्रकृती गंभीर असूनही त्याला त्याच्या घरी सोमनाथपूरला आणण्यात आलं. दरम्यान,पोलिसांनी आयपीसी (IPC) 326 हे गंभीर दुखापतीस कारणीभुत असल्याचे एकच कलम लावले. पीडित मुलगा हा दलित समाजातील असल्यामुळे ऍट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यास हवा होता. पण पोलिसांनी हा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली या मुळे ऍट्रोसिटी कायदा सेकशन 4 नुसार पोलिसांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 27, 2012 01:41 PM IST

सुट्टी मागणार्‍या मुलांवर अमानुष अत्याचार

27 मे

लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये कार सर्व्हिसिंग सेंटरमध्ये बालकामगाराला अमानवीय पद्धतीने गंभीर दुखापत करण्याची घटना घडली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्य दिवशी म्हणजे 14 एप्रिलला त्यानी सुट्टी मागितली. पण त्याला सुट्टी न दिल्यानं तो निघून जात असताना इथं काम करणार्‍या जावेद पटेल आणि सलीम पटेल या दोन मेकॅनिकनी एअर कंम्प्रेसरने त्याच्या गुदवारात हवा भरली. त्यामुळे त्याचे पोट फुगले आतडं फाटलं. या मुलाचे पालक हे वीट भट्टी कामगार आहेत. पोलिसांनी पालकांची तक्रार दाखल करुन घेतली नाही. त्यानंतर त्यांनी मुलाला उपचारासाठी लातूरच्या शासकीय हॉस्पिटल गाठले. पण गुन्हा दाखल नसल्याने आम्ही मुलाला दाखल करु शकत नाही असे सांगितले.

पोलिसांनी 1 मे रोजी गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या सोबतच पेट्रोलपंप मालकाविरुद्ध ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करवा आणि फरार असलेल्या दुसर्‍या मालकाला अटक करण्याची मागणी मानवी हक्क अभियानचे अध्यक्ष एकनाथ आव्हाड यांनी केली आहे. या मागणीसाठी उदगीरमध्ये श्रमिक विकास संघटना आणि मानवी हक्क अभियान 1 जून रोजी उदगीर येथे मोर्चा काढणार आहे. परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला उपचाराचा खर्च परवडत नाही. त्यामुळे प्रकृती गंभीर असूनही त्याला त्याच्या घरी सोमनाथपूरला आणण्यात आलं.

दरम्यान,पोलिसांनी आयपीसी (IPC) 326 हे गंभीर दुखापतीस कारणीभुत असल्याचे एकच कलम लावले. पीडित मुलगा हा दलित समाजातील असल्यामुळे ऍट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यास हवा होता. पण पोलिसांनी हा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली या मुळे ऍट्रोसिटी कायदा सेकशन 4 नुसार पोलिसांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 27, 2012 01:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close