S M L

'रेन वॉटर हार्वेस्टिंग' गरजेच मात्र पालिकेचं दुर्लक्षच !

प्राची कुलकर्णी, पुणे27 मे2007 साली सोसायट्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं नियमाप्रमाणे बंधनकारक करण्यात आलं. पण आत्तापर्यंत फक्त 56 सोसायट्यांमध्येच रेन वॉटर हार्वेस्टिंग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. एकीकडे रेन वॉटर हार्वेस्टिंगचे अनेक यशस्वी प्रकल्प पुण्यामध्ये उभे राहिलेअसताना महापालिका याप्रश्नी इतकी उदासीन का आहे असा प्रश्न आता उपस्थित होतोय. पुण्यातला विमाननगर परिसरातली लुंकड ग्रीन पार्क सोसायटी.. पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहाव्या लागणार्‍या भागामध्ये ही सोसायटी 2000 साली उभी राहिली. सोसायटीमध्ये लोक रहायला तर आले. पण बाराही महिने पाण्यासाठी त्यांना अवलंबुन रहावं लागत होतं ते रोज येणार्‍या टँकरवर. 'पहले पानी आता था तो किडे मकोडे निकलते थे.. पाईपलाईन अच्छी नही थी.. बिमारी फैलती थी' अशी व्यथा येथील रहिवाशी सुषमा सिंग यांनी मांडली.वैतागलेल्या रहिवाशांना पर्याय सापडला तो रेन वॉटर हार्वेस्टिंगचा..पावसाचं पाणी वाहुन जाऊ न देता थेट पाईपमधून बोअरवेलमध्ये सोडायचं ही संकल्पना.. इथे राहणार्‍या कर्नल दळवींनी माहिती घेऊन सोसायटी मध्ये हा प्रयोग राबवला आणि तीन टँकर पाणी लागणारी ही सोसायटी टँकरमुक्त तर झालीच पण आसपासच्या परिसरात बाग फुलवण्याइतका पाणीसाठा त्यांच्याकडे जमला आहे. या सोसायटीमध्ये ही परिस्थिती असली तरी पुण्यामध्ये हे चित्र नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करणारा नियम 2007 पासुन लागू झाला. तेव्हापासुन आत्ता पर्यंत पुणे शहरामध्ये एकूण 56 सोसायट्यांनीच रेन वॉटर हार्वेस्टिंग करत असल्याची नोंद केली आहे. अनेक हॉस्पिटल्स,महाविद्यालयामध्ये हा प्रयोग यशस्वीपणे राबवण्यात आलाय. पण सरकारी कार्यालयं मात्र याबाबत अजूनही उदासीन आहेत. एकीकडे धरणांवर अवलंबुन असणार्‍या पुणे शहराला यंदा मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईला सामोरं जावं लागतंय. तर दुसरीकडे मात्र महापालिका यासाठी काहीच करायला प्रयत्न करत नसल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. किमान यापुढे तरी पालिका यासाठी प्रयत्न करणार का हाच प्रश्न आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 27, 2012 10:19 AM IST

प्राची कुलकर्णी, पुणे

27 मे

2007 साली सोसायट्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं नियमाप्रमाणे बंधनकारक करण्यात आलं. पण आत्तापर्यंत फक्त 56 सोसायट्यांमध्येच रेन वॉटर हार्वेस्टिंग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. एकीकडे रेन वॉटर हार्वेस्टिंगचे अनेक यशस्वी प्रकल्प पुण्यामध्ये उभे राहिलेअसताना महापालिका याप्रश्नी इतकी उदासीन का आहे असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

पुण्यातला विमाननगर परिसरातली लुंकड ग्रीन पार्क सोसायटी.. पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहाव्या लागणार्‍या भागामध्ये ही सोसायटी 2000 साली उभी राहिली. सोसायटीमध्ये लोक रहायला तर आले. पण बाराही महिने पाण्यासाठी त्यांना अवलंबुन रहावं लागत होतं ते रोज येणार्‍या टँकरवर. 'पहले पानी आता था तो किडे मकोडे निकलते थे.. पाईपलाईन अच्छी नही थी.. बिमारी फैलती थी' अशी व्यथा येथील रहिवाशी सुषमा सिंग यांनी मांडली.

वैतागलेल्या रहिवाशांना पर्याय सापडला तो रेन वॉटर हार्वेस्टिंगचा..पावसाचं पाणी वाहुन जाऊ न देता थेट पाईपमधून बोअरवेलमध्ये सोडायचं ही संकल्पना.. इथे राहणार्‍या कर्नल दळवींनी माहिती घेऊन सोसायटी मध्ये हा प्रयोग राबवला आणि तीन टँकर पाणी लागणारी ही सोसायटी टँकरमुक्त तर झालीच पण आसपासच्या परिसरात बाग फुलवण्याइतका पाणीसाठा त्यांच्याकडे जमला आहे.

या सोसायटीमध्ये ही परिस्थिती असली तरी पुण्यामध्ये हे चित्र नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करणारा नियम 2007 पासुन लागू झाला. तेव्हापासुन आत्ता पर्यंत पुणे शहरामध्ये एकूण 56 सोसायट्यांनीच रेन वॉटर हार्वेस्टिंग करत असल्याची नोंद केली आहे. अनेक हॉस्पिटल्स,महाविद्यालयामध्ये हा प्रयोग यशस्वीपणे राबवण्यात आलाय. पण सरकारी कार्यालयं मात्र याबाबत अजूनही उदासीन आहेत.

एकीकडे धरणांवर अवलंबुन असणार्‍या पुणे शहराला यंदा मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईला सामोरं जावं लागतंय. तर दुसरीकडे मात्र महापालिका यासाठी काहीच करायला प्रयत्न करत नसल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. किमान यापुढे तरी पालिका यासाठी प्रयत्न करणार का हाच प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 27, 2012 10:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close