S M L

'..तर फिल्मसिटीत एकही शुटिंग चालू देणार नाही'

28 मेमुंबईतल्या गोरेगाव फिल्मसिटीतील मराठी मालिकांची सवलत रद्द केल्याच्या निषेधार्थ शिवसेना-मनसेचे कार्यकर्ते फिल्मसिटीवर धडकले. सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी मराठी मालिकांसाठीच्या सवलतींच्या संदर्भात दोन दिवसात निर्णय घेतला नाही तर फिल्मसिटीमध्ये एकही शुटिंग चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. मुंबईतल्या गोरेगावची चित्रनगरी दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणून ओळखली जाते. मालिकेच्या निर्मात्यांना इथे शुटिंग करण्यासाठी 50 टक्के सवलत मिळते. पण ही सवलतच सरकारनं अचानक रद्द केल्यानं निर्मितीच्या खर्चात खूप वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या चित्रनगरीत उंच माझा झोका या केवळ एकाच मालिकेचं शुटिंग सुरु आहे. या मुद्द्यावरुन आता मनसे आणि शिवसेनेच्या चित्रपट शाखांनी पुढाकार घेतला आहे. आज फिल्मसिटीमध्ये या दोन्ही पक्षांचे नेत्यांनी व्यवस्थपकांना भेटून निवेदन दिले आहे. तसेच दोन दिवसात यावर निर्णय घ्यावा अन्यथा एकही शुटिंग चालू देणार नाही असा इशारा दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 28, 2012 11:05 AM IST

'..तर फिल्मसिटीत एकही शुटिंग चालू देणार नाही'

28 मे

मुंबईतल्या गोरेगाव फिल्मसिटीतील मराठी मालिकांची सवलत रद्द केल्याच्या निषेधार्थ शिवसेना-मनसेचे कार्यकर्ते फिल्मसिटीवर धडकले. सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी मराठी मालिकांसाठीच्या सवलतींच्या संदर्भात दोन दिवसात निर्णय घेतला नाही तर फिल्मसिटीमध्ये एकही शुटिंग चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. मुंबईतल्या गोरेगावची चित्रनगरी दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणून ओळखली जाते. मालिकेच्या निर्मात्यांना इथे शुटिंग करण्यासाठी 50 टक्के सवलत मिळते. पण ही सवलतच सरकारनं अचानक रद्द केल्यानं निर्मितीच्या खर्चात खूप वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या चित्रनगरीत उंच माझा झोका या केवळ एकाच मालिकेचं शुटिंग सुरु आहे. या मुद्द्यावरुन आता मनसे आणि शिवसेनेच्या चित्रपट शाखांनी पुढाकार घेतला आहे. आज फिल्मसिटीमध्ये या दोन्ही पक्षांचे नेत्यांनी व्यवस्थपकांना भेटून निवेदन दिले आहे. तसेच दोन दिवसात यावर निर्णय घ्यावा अन्यथा एकही शुटिंग चालू देणार नाही असा इशारा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2012 11:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close