S M L

गोदावरीला सांडपाण्याचा वेढा

दीप्ती राऊत, नाशिक28 मेदक्षिणेतली गंगा म्हणून प्रसिद्ध असणारी नाशिकची गोदावरी..याच गोदाकाठी भरणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कोट्यावधी रुपयांचे आराखडे तयार झाले आहे. पण हे सगळं जिच्या पुण्याईवर होतंय, ती गोदावरी मात्र पानवेलींच्या विळख्यात गुदमरतेय. नाशिकच्या महापौरपदी मनसेचे पहिले महापौर विराजमान झाले आणि त्यांनी पहिला दौरा केला तो गोदावरीच्या पाहणीचा. महापौरांसाठी हा पहिला दौरा होता, पण गोदावरीसाठी नेहमीचाच. नेत्यांची पाहाणी, अधिकार्‍यांच्या गाड्यांचे ताफे, गोदापात्राच्या स्वच्छतेच्या वल्गना नदीला नेहमीच्या झाल्यात..प्रत्यक्षात दौरा संपला की परिस्थिती जैसे थे..वर पाणवेली आणि खाली गाळ..औषधालाही स्वच्छ पाणी सापडणार नाही असं हे गोदापात्र सगळ्यांनी सगळी आंदोलनं करून झाली. पण गोदावरी काही स्वच्छ होत नाही.खरं तर गोदापात्रात थेट सोडलं जाणारं महापालिकेचं सांडपाणी हेच या पाणवेलींच्या रोगाचं मूळ आहे. तसा अहवाल प्रदूषण महामंडळाने दोन वर्षांपूर्वी दिलाय. पण त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी महापालिकेला रस असतो तो टेंडर देऊन गोदापात्र स्वच्छ करण्यात. गोदावरी नदी काही स्वच्छ होत नाही, पण गोदावरी स्वच्छतेच्या नावाखाली महापालिकेची तिजोरी मात्र धुतली जातेय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 28, 2012 12:24 PM IST

गोदावरीला सांडपाण्याचा वेढा

दीप्ती राऊत, नाशिक

28 मे

दक्षिणेतली गंगा म्हणून प्रसिद्ध असणारी नाशिकची गोदावरी..याच गोदाकाठी भरणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कोट्यावधी रुपयांचे आराखडे तयार झाले आहे. पण हे सगळं जिच्या पुण्याईवर होतंय, ती गोदावरी मात्र पानवेलींच्या विळख्यात गुदमरतेय.

नाशिकच्या महापौरपदी मनसेचे पहिले महापौर विराजमान झाले आणि त्यांनी पहिला दौरा केला तो गोदावरीच्या पाहणीचा. महापौरांसाठी हा पहिला दौरा होता, पण गोदावरीसाठी नेहमीचाच. नेत्यांची पाहाणी, अधिकार्‍यांच्या गाड्यांचे ताफे, गोदापात्राच्या स्वच्छतेच्या वल्गना नदीला नेहमीच्या झाल्यात..

प्रत्यक्षात दौरा संपला की परिस्थिती जैसे थे..वर पाणवेली आणि खाली गाळ..औषधालाही स्वच्छ पाणी सापडणार नाही असं हे गोदापात्र सगळ्यांनी सगळी आंदोलनं करून झाली. पण गोदावरी काही स्वच्छ होत नाही.

खरं तर गोदापात्रात थेट सोडलं जाणारं महापालिकेचं सांडपाणी हेच या पाणवेलींच्या रोगाचं मूळ आहे. तसा अहवाल प्रदूषण महामंडळाने दोन वर्षांपूर्वी दिलाय. पण त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी महापालिकेला रस असतो तो टेंडर देऊन गोदापात्र स्वच्छ करण्यात. गोदावरी नदी काही स्वच्छ होत नाही, पण गोदावरी स्वच्छतेच्या नावाखाली महापालिकेची तिजोरी मात्र धुतली जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2012 12:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close