S M L

रमाबाई आंबेडकर यांचे स्मारक वादात अडकले

28 मेडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचं भारतातलं पहिलं वहीलं स्मारक वादात अडकलं आहे. रमा आंबेडकर यांच्या दापोली जवळ असलेल्या वणंद या माहेर गावी हे स्मारक बांधण्याचं काम बौध्द महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि बाबासाहेबांची सून मीरा आंबेडकर यांनी हाती घेतलं. त्यासाठी त्यांना 9 गुंठे जागा रमाबाई आंबेडकर यांच्या नातेवाईकांनी बक्षिसपत्रानंही दिली. 2004 मध्ये हे बांधकाम सुरुही झालं. मात्र याच गावातल्या बौद्ध जन सेवा संघानं ते आपल्या ताब्यात द्यावं यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे हे स्मारक पूर्ण होऊनही उद्घटनाच्या प्रतीक्षेत अडकलंय. विशेष म्हणजे रविवारी रमा आंबेडकरांचा स्मृती दिन असतानाही दोन्ही गटांच्या तक्रारीमुळे या स्मारका शेजारी पोलिसांनी 144 कलम लावलं. आणि खुद्द मीरा आंबेडकरांनाच या स्मारकात जायला मज्जाव केला. बाबासाहेबांच्या पत्नीच्या माहेरी झालेल्या एकमेव स्मारकबाबत सुरू असलेल्या या वादावर आंबेडकरी चळवळीने तरी तोडगा काढावा अशी मागणी आता होऊ लागली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 28, 2012 03:05 PM IST

रमाबाई आंबेडकर यांचे स्मारक वादात अडकले

28 मे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचं भारतातलं पहिलं वहीलं स्मारक वादात अडकलं आहे. रमा आंबेडकर यांच्या दापोली जवळ असलेल्या वणंद या माहेर गावी हे स्मारक बांधण्याचं काम बौध्द महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि बाबासाहेबांची सून मीरा आंबेडकर यांनी हाती घेतलं. त्यासाठी त्यांना 9 गुंठे जागा रमाबाई आंबेडकर यांच्या नातेवाईकांनी बक्षिसपत्रानंही दिली. 2004 मध्ये हे बांधकाम सुरुही झालं. मात्र याच गावातल्या बौद्ध जन सेवा संघानं ते आपल्या ताब्यात द्यावं यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे हे स्मारक पूर्ण होऊनही उद्घटनाच्या प्रतीक्षेत अडकलंय. विशेष म्हणजे रविवारी रमा आंबेडकरांचा स्मृती दिन असतानाही दोन्ही गटांच्या तक्रारीमुळे या स्मारका शेजारी पोलिसांनी 144 कलम लावलं. आणि खुद्द मीरा आंबेडकरांनाच या स्मारकात जायला मज्जाव केला. बाबासाहेबांच्या पत्नीच्या माहेरी झालेल्या एकमेव स्मारकबाबत सुरू असलेल्या या वादावर आंबेडकरी चळवळीने तरी तोडगा काढावा अशी मागणी आता होऊ लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2012 03:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close