S M L

एचआयव्हीग्रस्त ड्रायव्हरला नोकरीवरुन काढले

29 मेपुण्यातल्या एचआयव्हीग्रस्त ड्रायव्हरला न्याय देण्याचं आश्वासन परिवहन मंत्री गुलाबराव देवकर यांनी दिलं होतं. तरीसुद्धा त्याला चक्क नोकरीवरूनच काढून टाकण्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे विभागातल्या एसटी ड्रायव्हरला एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्यामुळे ड्रायव्हर म्हणून काम करता येत नव्हतं. त्याना हलकं काम देण्याची मागणी करूनही त्याला चार महिन्यांपासून एसटी महामंडळानं घरी बसवलं होतं. पण आयबीएन लोकमतने या अन्यायाला वाचा फोडल्यावर या ड्रायव्हरला शिपायाचं काम देत असल्याचं पत्र एसटी विभागानं दिलं. पण, थोड्याच दिवसांत त्याला पुन्हा टेस्टसाठी ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. आणि त्यानंतर त्याला अनफिट असल्याचं कारण सांगत थेट नोकरीवरून काढून टाकत असल्याचं पत्र एसटी कडून देण्यात आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 29, 2012 05:42 PM IST

एचआयव्हीग्रस्त ड्रायव्हरला नोकरीवरुन काढले

29 मे

पुण्यातल्या एचआयव्हीग्रस्त ड्रायव्हरला न्याय देण्याचं आश्वासन परिवहन मंत्री गुलाबराव देवकर यांनी दिलं होतं. तरीसुद्धा त्याला चक्क नोकरीवरूनच काढून टाकण्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे विभागातल्या एसटी ड्रायव्हरला एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्यामुळे ड्रायव्हर म्हणून काम करता येत नव्हतं. त्याना हलकं काम देण्याची मागणी करूनही त्याला चार महिन्यांपासून एसटी महामंडळानं घरी बसवलं होतं. पण आयबीएन लोकमतने या अन्यायाला वाचा फोडल्यावर या ड्रायव्हरला शिपायाचं काम देत असल्याचं पत्र एसटी विभागानं दिलं. पण, थोड्याच दिवसांत त्याला पुन्हा टेस्टसाठी ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. आणि त्यानंतर त्याला अनफिट असल्याचं कारण सांगत थेट नोकरीवरून काढून टाकत असल्याचं पत्र एसटी कडून देण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2012 05:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close