S M L

नाशिकमध्ये भुजबळांच्या वर्चस्वाला सुरुंग

दीप्ती राऊत,नाशिक29 मेविधान परिषदेच्या निवडणुकीत नाशिकमधून राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले असले तरी हा विजय चिठ्ठी टाकून कौल घेतल्यामुळे झाला. या निवडणुकीत भुजबळांच्या नाशिकमधल्या वर्चस्वाला सुरुंग लागला. म्हणूनच संतापलेल्या भुजबळांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या जयंत जाधवांच्या गळ्यात विजयाची माळ पडली पण, फुटलेली मतं आघाडीसाठी धोक्याची घंटा ठरली. खरं तर या धोक्याच्या घंटेची किणकीण गेल्या लोकसभेपासूनच सुरू झाली होती. सुरुवातीला काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी, मग माळी विरुद्ध मराठा आणि आता भुजबळ विरुद्ध कोकाटे असा हा संघर्ष प्रकट होतो. पण दोन्ही पक्षांच्या श्रेष्टींनी स्वपक्षांचे खुंटे बळकट करण्यासाठी त्याला पडद्यामागून खतपणीच घातलंय. विधान परिषदेतली आघाडीची घटती मतं त्याचंच द्योतक आहे. लकी ड्रॉमुळे नाशिकची जागा मिळाली असली, तरी राष्ट्रवादीला काँग्रेसच्याच काय. स्वत:च्या सदस्यांचीही मतं पडली नाहीत. भुजबळांनी स्पष्ट नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख स्पष्ट होता तो नाशिकमधल्या काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर... सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांची भुजबळांबाबतची नाराजी उघड आहेत. त्याशिवाय काँग्रेसचे काही सदस्य आणि स्वत: राष्ट्रवादीतलेच काहीजण भुजबळांच्या विरोधात उघडपणे काम करतात. त्यामुळे भुजबळांच्या नाशिकमधल्या वर्चस्वाला या निवडणुकीच्या निमित्तानं तडे गेल्याचं उघड झालंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 29, 2012 05:56 PM IST

नाशिकमध्ये भुजबळांच्या वर्चस्वाला सुरुंग

दीप्ती राऊत,नाशिक

29 मे

विधान परिषदेच्या निवडणुकीत नाशिकमधून राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले असले तरी हा विजय चिठ्ठी टाकून कौल घेतल्यामुळे झाला. या निवडणुकीत भुजबळांच्या नाशिकमधल्या वर्चस्वाला सुरुंग लागला. म्हणूनच संतापलेल्या भुजबळांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या जयंत जाधवांच्या गळ्यात विजयाची माळ पडली पण, फुटलेली मतं आघाडीसाठी धोक्याची घंटा ठरली. खरं तर या धोक्याच्या घंटेची किणकीण गेल्या लोकसभेपासूनच सुरू झाली होती. सुरुवातीला काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी, मग माळी विरुद्ध मराठा आणि आता भुजबळ विरुद्ध कोकाटे असा हा संघर्ष प्रकट होतो. पण दोन्ही पक्षांच्या श्रेष्टींनी स्वपक्षांचे खुंटे बळकट करण्यासाठी त्याला पडद्यामागून खतपणीच घातलंय. विधान परिषदेतली आघाडीची घटती मतं त्याचंच द्योतक आहे. लकी ड्रॉमुळे नाशिकची जागा मिळाली असली, तरी राष्ट्रवादीला काँग्रेसच्याच काय. स्वत:च्या सदस्यांचीही मतं पडली नाहीत.

भुजबळांनी स्पष्ट नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख स्पष्ट होता तो नाशिकमधल्या काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर... सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांची भुजबळांबाबतची नाराजी उघड आहेत. त्याशिवाय काँग्रेसचे काही सदस्य आणि स्वत: राष्ट्रवादीतलेच काहीजण भुजबळांच्या विरोधात उघडपणे काम करतात. त्यामुळे भुजबळांच्या नाशिकमधल्या वर्चस्वाला या निवडणुकीच्या निमित्तानं तडे गेल्याचं उघड झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2012 05:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close