S M L

साकीनाक्यात पार्किंगच्या वादातून दोघांची हत्या

30 मेमुंबईतल्या साकीनाका परिसरात पार्किंगच्या वादातून एका कुटुंबावर चौघांनी धारदार शस्त्रांने हल्ला केला. यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला तर कुटुंबातील दोन सदस्य जखमी झाले आहेत. दोन हल्लेखोरांनी हा धारदार शस्त्रांनी हल्ला करुन आशिष आणि अविनाश या दोघांची हत्या केली आहे. चार पाच दिवासांपुर्वी पार्किंगच्या कारणावरुन एका अज्ञात व्यक्तीसोबत या आशिष आणि अविनाशचा वाद झाला होता. त्याचे पर्यवसन नंतर भांडणात झाले. हयाच भांडणाचा राग मनात ठेऊन हल्लेखोरांनी संपूर्ण कुटुंबावर हल्ला केला असल्याचा पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी राकेश शर्मा आणि सुनीता शर्मा या दोन आरोपींना अटक केली आहे. तर चार आरोपी सुनील शर्मा, राजेश शर्मा, पिंटू शर्मा आणि शानु शर्मा हे फरार आहेत. साकिनाका पोलीस या चौघांचा शोध घेत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 30, 2012 10:51 AM IST

साकीनाक्यात पार्किंगच्या वादातून दोघांची हत्या

30 मे

मुंबईतल्या साकीनाका परिसरात पार्किंगच्या वादातून एका कुटुंबावर चौघांनी धारदार शस्त्रांने हल्ला केला. यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला तर कुटुंबातील दोन सदस्य जखमी झाले आहेत. दोन हल्लेखोरांनी हा धारदार शस्त्रांनी हल्ला करुन आशिष आणि अविनाश या दोघांची हत्या केली आहे. चार पाच दिवासांपुर्वी पार्किंगच्या कारणावरुन एका अज्ञात व्यक्तीसोबत या आशिष आणि अविनाशचा वाद झाला होता. त्याचे पर्यवसन नंतर भांडणात झाले. हयाच भांडणाचा राग मनात ठेऊन हल्लेखोरांनी संपूर्ण कुटुंबावर हल्ला केला असल्याचा पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी राकेश शर्मा आणि सुनीता शर्मा या दोन आरोपींना अटक केली आहे. तर चार आरोपी सुनील शर्मा, राजेश शर्मा, पिंटू शर्मा आणि शानु शर्मा हे फरार आहेत. साकिनाका पोलीस या चौघांचा शोध घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 30, 2012 10:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close