S M L

जंगल तोडून उद्योजकांच्या घशात घालण्याचा डाव - राज

31 मेवाघांना वाचवण्यासाठी वन विभागाकडे कोणती उपयायोजना नाही. शिकार्‍यापासून वाचवण्यासाठी कोणतीही हत्यारं नाही वाघांचे काय होते याकडे यांचे लक्ष नाही पण जंगलची जंगल पेटवून देऊन जमीन उद्योजकांच्या घशात घातल्या जात आहे. मंत्र्यांचाही जमिनीच्या जमिनी गोळा करण्याचा धंदा सुरु आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केला. तसेच प्रत्येक वेळा संपात यांचीच लोक बसेसची तोडफोड करणार आणि यांच्याच तावडीत महानगरपालिका, बेस्टची सेवा आहे. अगोदर तोडफोड करायची आणि त्यानंतर नव्याने ट्रेंडर काढायची आणि पुन्हा भारत बंद करायचा सोपी रचना आहे असा टोलाही राज ठाकरे यांनी शिवसेनेला लगावला. राज ठाकरे सध्या विदर्भ दौर्‍यावर आहे. आज चंद्रपूरमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.मागिल महिन्यात ताडोबाच्या परिसरात तीन वाघांची हत्या झाली. तसेच राज्यातील वाघांच्या शिकारीची सुपारीच बहेलिया जमातीला देण्यात आली आहे. याप्रकरणानंतर ताडोबा अभयारण्याच्या परिसरात दुसर्‍याच्या दिवशी गोंडमोहाडी येथे वाघांची सापळा रचून हत्या करण्यात आली होती. शिकार्‍यांची 'खबर' घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौर्‍यावर आहे. आज चंद्रपूरमध्ये राज यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी काल पळसगावमध्ये वाघाच्या जागेची पाहणी केली. तसेच त्यांनी ताडोबाच्या आतील पाणवठ्यांसंदर्भात माहिती घेतली. वाघांच्या संवर्धनाबाबत सरकारच दुर्लक्ष आणि स्थानिकांची असणारी उदासिनता याबाबत लक्ष घालणं गरजेचं आहे. काही स्वयंसेवी संस्थांना विश्वासात घेऊन वाघांचं संवर्धन केलं पाहिजे. मात्र सरकारचे याकडे साफ दुर्लक्ष आहे. वाघांच्या संरक्षणासाठी नीट हत्यार सुध्दा वनविभागाकडे नाही. दुसरीकडे जंगलची जंगल पेटवून देऊन ही जमीन उद्योजकांच्या घशात घातल्या जात आहे असा आरोप राज यांनी केला. तसेच मी इथं काही प्रसिध्दीसाठी आलो नाही. या मुक्याप्राण्याबद्दल आस्था आहे म्हणून इथं आलो. याच राजकारणाशी काहीही संबंध नाही. वाघासारख्या इतक्या सुंदर प्राण्याची हत्या होते हे खरे दुर्देव आहे अशा प्रकरणावर टीका करुन काही फायदा नाही याचा नीट विचार केला पाहिजे आणि वाघांचे संवर्धन झाले पाहिजे असंही राज म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 31, 2012 08:11 AM IST

जंगल तोडून उद्योजकांच्या घशात घालण्याचा डाव - राज

31 मे

वाघांना वाचवण्यासाठी वन विभागाकडे कोणती उपयायोजना नाही. शिकार्‍यापासून वाचवण्यासाठी कोणतीही हत्यारं नाही वाघांचे काय होते याकडे यांचे लक्ष नाही पण जंगलची जंगल पेटवून देऊन जमीन उद्योजकांच्या घशात घातल्या जात आहे. मंत्र्यांचाही जमिनीच्या जमिनी गोळा करण्याचा धंदा सुरु आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केला. तसेच प्रत्येक वेळा संपात यांचीच लोक बसेसची तोडफोड करणार आणि यांच्याच तावडीत महानगरपालिका, बेस्टची सेवा आहे. अगोदर तोडफोड करायची आणि त्यानंतर नव्याने ट्रेंडर काढायची आणि पुन्हा भारत बंद करायचा सोपी रचना आहे असा टोलाही राज ठाकरे यांनी शिवसेनेला लगावला. राज ठाकरे सध्या विदर्भ दौर्‍यावर आहे. आज चंद्रपूरमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.

मागिल महिन्यात ताडोबाच्या परिसरात तीन वाघांची हत्या झाली. तसेच राज्यातील वाघांच्या शिकारीची सुपारीच बहेलिया जमातीला देण्यात आली आहे. याप्रकरणानंतर ताडोबा अभयारण्याच्या परिसरात दुसर्‍याच्या दिवशी गोंडमोहाडी येथे वाघांची सापळा रचून हत्या करण्यात आली होती. शिकार्‍यांची 'खबर' घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौर्‍यावर आहे. आज चंद्रपूरमध्ये राज यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

त्यांनी काल पळसगावमध्ये वाघाच्या जागेची पाहणी केली. तसेच त्यांनी ताडोबाच्या आतील पाणवठ्यांसंदर्भात माहिती घेतली. वाघांच्या संवर्धनाबाबत सरकारच दुर्लक्ष आणि स्थानिकांची असणारी उदासिनता याबाबत लक्ष घालणं गरजेचं आहे. काही स्वयंसेवी संस्थांना विश्वासात घेऊन वाघांचं संवर्धन केलं पाहिजे. मात्र सरकारचे याकडे साफ दुर्लक्ष आहे. वाघांच्या संरक्षणासाठी नीट हत्यार सुध्दा वनविभागाकडे नाही. दुसरीकडे जंगलची जंगल पेटवून देऊन ही जमीन उद्योजकांच्या घशात घातल्या जात आहे असा आरोप राज यांनी केला. तसेच मी इथं काही प्रसिध्दीसाठी आलो नाही. या मुक्याप्राण्याबद्दल आस्था आहे म्हणून इथं आलो. याच राजकारणाशी काहीही संबंध नाही. वाघासारख्या इतक्या सुंदर प्राण्याची हत्या होते हे खरे दुर्देव आहे अशा प्रकरणावर टीका करुन काही फायदा नाही याचा नीट विचार केला पाहिजे आणि वाघांचे संवर्धन झाले पाहिजे असंही राज म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 31, 2012 08:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close