S M L

औरंगाबाद क्रिकेट संघटना वादाच्या भोवर्‍यात

25 नोव्हेंबर, माधव सावरगावेऔरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेमध्ये सध्या जोरदार वाद सुरु आहेत. त्यातच येत्या 30 नोव्हेंबरला जिल्हा संघटनेची निवडणूक असल्यानं या वादाला राजकीय रंग चढला आहे. दुसरीकडे वर्षोनुवर्षे संघटनेत राजकारण आणि वाद होत असल्यानं खेळच संपलाय, असा आरोप खेळाडूंनी केला आहे.संघटनेचे सचिव जे.यू .मिटकर यांनी एकाधिकारशाहीचा आरोप होताच. त्यात आता एक नवा वाद समोर आला आहे. संघटनेतल्या कोणत्याही सदस्यांना माहित नसताना नव्या 43 सदस्यांची नावे अचानक मतदार यादीत घुसवण्यात आली आहेत. "जे लाईफमेंबर आहेत त्यांच्याशिवाय 43 नवीन नावे अ‍ॅड करण्यात आली आहेत. ते कोणत्या आधारावर आले..त्यांच्याकडे रिसीप्ट आहे काय याची काहीही माहिती नाही" असं क्रिकेटर दिनेश कुंटेनं सांगितलं.बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक असो की कुठल्याही जिल्हा क्रिकेट संघटनेची. त्याठिकाणी राजकारण आलंच आणि औरंगाबाद क्रिकेट समितीही त्याला अपवाद नाही. सततचा वाद आणि राजकारणांमुळे खेळाकडे मात्र दुर्लक्ष झालंय. 199 आजीव सदस्य असलेल्या या संघटनेत आता अनेक गट तयार झाले आहेत. या गटाकडून खेळाचा विकास करण्याऐवजी पदासाठी एकमेकांवर चिकलफेक सुरू आहे. 2005 मध्ये जिल्हा क्रिकेट संघटनेची निवडणूक झाली. पण त्यानंतर सदस्य नोदंणी आणि निवडणुकही झाली नाही.. यावर खेळाडूंनी आक्षेप घेतला. पण संघटनेच्या सचिवांनी त्यांना फक्त आपल्या खेळाकडे लक्ष देण्याचा सल्ला देत उडवून लावलं. नव्यानं आलेल्या सदस्यांबाबत बोलण्यासही त्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे अध्यक्षांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.पश्चिम विभागीय महिला क्रिकेटचे सामने सध्या याच मैदानावर सुरु आहेत. पण संघटनेच्या पदाधिकार्‍यांना याचं सोयरसुतक नाही. त्यांचं सध्या लक्ष आहे ते एकमेकांना कोंडीत कसं टाकता येईल याकडे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 25, 2008 11:54 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 25, 2008 11:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close