S M L

विश्वनाथन आनंद पाचव्यांदा जगज्जेता

30 मेबुध्दिबळातील 64 घरांचा राजा म्हणून भारताच्या ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदने आज इतिहास रचला आहे. आनंद पाचव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन ठरला आहे. मॉस्कोत सुरु असलेल्या वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या विश्वनाथन आनंदने इस्त्राईलच्या बोरिस गेलफंडचा पराभव केला आहे. 12 मॅचनंतरही समान पॉईंट असल्याने आज आनंद आणि गेलफंडमध्ये टायब्रेकर खेळवला गेला. ज्यात आनंदन बाजी मारली. टायब्रेकमध्ये पहिल्यांदा 4 रॅपिड गेम्स खेळले गेले. ज्यात पहिला गेम बरोबरीत सुटला. तर दुसर्‍या गेममध्ये विजय मिळवत आनंदनं गेलफंडवर आघाडी घेतली. आनंदसाठी ही स्पर्धा हवी तशी सोपी नव्हती बोरिस गेलफंडनं त्याला विजयासाठी कडवी झुंज दिली. सुरुवातीला झालेल्या 12 मॅच पैकी तब्बल 10 मॅच ड्रॉ झाल्या. तर प्रत्येकी एका मॅचमध्ये आनंद आणि गेलफंडनं बाजी मारली. विश्वनाथन आनंदनं तब्बल पाचव्यांदा वर्ल्ड चेस चॅम्पियन होण्याचा किताब पटकावला आहे. 2000, 2007, 2008 आणि 2010 साली आनंद वर्ल्ड चॅम्पियन ठरला. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव खेळाडू ठरला आहे. विश्वनाथन आनंदनं यापूर्वी कधी विश्वविजेतेपद पटकावलंय- 2000 - ऍलेक्सी शिरोव्ह (रशिया)- 2007 - व्लादिमिर क्रामनिक (रशिया), बोरिस गेलफंड (इस्त्राईल)- 2008 - व्लादिमिर क्रामनिक (रशिया) - 2010 - वेसेलिन टोपोलोव्ह (बल्गेरिया)- भारताचा पहिला ग्रँड मास्टर (1987)- एप्रिल 2007 आणि नोव्हेंबर 2010 मध्ये वर्ल्ड नंबर 1- सध्या वर्ल्ड नंबर 4- टुर्नामेंट, मॅच, रॅपिड आणि नॉकआऊट जिंकणारा जगातील एकमेव खेळाडू- रॅपिड चेस चॅम्पियन - 1994, 1997, 2003, 2005, 2006- कोरस चॅम्पियनशिप - 1989, 1998, 2003, 2004, 2006- कोरस चॅम्पियनशिप 5 वेळा जिंकणारा एकमेव खेळाडू- लिनारेस चॅम्पियनशिप - 1998, 2007, 2008- डॉर्टमंड चॅम्पियनशिप - 1996, 2000, 2004

आईबीएन लोकमत | Updated On: May 30, 2012 01:04 PM IST

विश्वनाथन आनंद पाचव्यांदा जगज्जेता

30 मे

बुध्दिबळातील 64 घरांचा राजा म्हणून भारताच्या ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदने आज इतिहास रचला आहे. आनंद पाचव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन ठरला आहे. मॉस्कोत सुरु असलेल्या वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या विश्वनाथन आनंदने इस्त्राईलच्या बोरिस गेलफंडचा पराभव केला आहे. 12 मॅचनंतरही समान पॉईंट असल्याने आज आनंद आणि गेलफंडमध्ये टायब्रेकर खेळवला गेला. ज्यात आनंदन बाजी मारली. टायब्रेकमध्ये पहिल्यांदा 4 रॅपिड गेम्स खेळले गेले. ज्यात पहिला गेम बरोबरीत सुटला. तर दुसर्‍या गेममध्ये विजय मिळवत आनंदनं गेलफंडवर आघाडी घेतली. आनंदसाठी ही स्पर्धा हवी तशी सोपी नव्हती बोरिस गेलफंडनं त्याला विजयासाठी कडवी झुंज दिली. सुरुवातीला झालेल्या 12 मॅच पैकी तब्बल 10 मॅच ड्रॉ झाल्या. तर प्रत्येकी एका मॅचमध्ये आनंद आणि गेलफंडनं बाजी मारली. विश्वनाथन आनंदनं तब्बल पाचव्यांदा वर्ल्ड चेस चॅम्पियन होण्याचा किताब पटकावला आहे. 2000, 2007, 2008 आणि 2010 साली आनंद वर्ल्ड चॅम्पियन ठरला. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव खेळाडू ठरला आहे.

विश्वनाथन आनंदनं यापूर्वी कधी विश्वविजेतेपद पटकावलंय

- 2000 - ऍलेक्सी शिरोव्ह (रशिया)- 2007 - व्लादिमिर क्रामनिक (रशिया), बोरिस गेलफंड (इस्त्राईल)- 2008 - व्लादिमिर क्रामनिक (रशिया) - 2010 - वेसेलिन टोपोलोव्ह (बल्गेरिया)- भारताचा पहिला ग्रँड मास्टर (1987)- एप्रिल 2007 आणि नोव्हेंबर 2010 मध्ये वर्ल्ड नंबर 1- सध्या वर्ल्ड नंबर 4- टुर्नामेंट, मॅच, रॅपिड आणि नॉकआऊट जिंकणारा जगातील एकमेव खेळाडू- रॅपिड चेस चॅम्पियन - 1994, 1997, 2003, 2005, 2006- कोरस चॅम्पियनशिप - 1989, 1998, 2003, 2004, 2006- कोरस चॅम्पियनशिप 5 वेळा जिंकणारा एकमेव खेळाडू- लिनारेस चॅम्पियनशिप - 1998, 2007, 2008- डॉर्टमंड चॅम्पियनशिप - 1996, 2000, 2004

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 30, 2012 01:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close