S M L

गाडीत गुदमरून दोन चिमुकल्यांच्या मृत्यू

30 मेठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांच्या गाडीत गुदमरून मृत्यू झाला. म्हाडा कॉलनीत ही दुदैर्वी घटना घडली. दहा वर्षांचा शिवशंकर आणि त्याचा 8 वर्षांचा लहान भाऊ रविशंकर जैसवाल या दोघांचा यात मृत्यू झाला. काही मुलं या परिसरात खेळत असताना त्यांना मारुती झेन गाडीत ही दोन मुलं दिसली. त्यानंतर पोलिसांनी येऊन गाडी उघडली तेव्हा दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याचं कळलं. हे दोघंही मुलं मारुती झेन गाडीत खेळण्यासाठी गेले पण तिथेच अडकून पडले. दोन दिवस त्यांचा पत्ता लागत नव्हता याबद्दल बेपत्ता असल्याची तक्रार बदलापूर पोलिसात दाखल केली होती. आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास म्हाडा कॉलनी परिसरात एमएच-01 -वाय- 3444 या क्रमांकाच्या मारूती झेन गाडीत दोन मुलं अडकली असल्याचे तिथे खेळणार्‍या मुलांनी पाहिले. त्यानंतर स्थानिकांनी याबाबत पोलिसांना सांगितले. पोलीस घटनास्थळी आल्यावर त्यांनी झेन गाडी उघडली असता त्यात दोन मुलं मृत अवस्थेत आढळून आली. ही दोन्ही मुलं दोन दिवसांपासून बेपत्ता होती. हे दोन्ही भाऊ दोन दिवसांपासून गाडीत अडकल्याने त्यांचे मृतदेह काळे निळे पडले होते. पोलिसांनी या दोघांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 30, 2012 03:37 PM IST

गाडीत गुदमरून दोन चिमुकल्यांच्या मृत्यू

30 मे

ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांच्या गाडीत गुदमरून मृत्यू झाला. म्हाडा कॉलनीत ही दुदैर्वी घटना घडली. दहा वर्षांचा शिवशंकर आणि त्याचा 8 वर्षांचा लहान भाऊ रविशंकर जैसवाल या दोघांचा यात मृत्यू झाला. काही मुलं या परिसरात खेळत असताना त्यांना मारुती झेन गाडीत ही दोन मुलं दिसली. त्यानंतर पोलिसांनी येऊन गाडी उघडली तेव्हा दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याचं कळलं.

हे दोघंही मुलं मारुती झेन गाडीत खेळण्यासाठी गेले पण तिथेच अडकून पडले. दोन दिवस त्यांचा पत्ता लागत नव्हता याबद्दल बेपत्ता असल्याची तक्रार बदलापूर पोलिसात दाखल केली होती. आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास म्हाडा कॉलनी परिसरात एमएच-01 -वाय- 3444 या क्रमांकाच्या मारूती झेन गाडीत दोन मुलं अडकली असल्याचे तिथे खेळणार्‍या मुलांनी पाहिले. त्यानंतर स्थानिकांनी याबाबत पोलिसांना सांगितले. पोलीस घटनास्थळी आल्यावर त्यांनी झेन गाडी उघडली असता त्यात दोन मुलं मृत अवस्थेत आढळून आली. ही दोन्ही मुलं दोन दिवसांपासून बेपत्ता होती. हे दोन्ही भाऊ दोन दिवसांपासून गाडीत अडकल्याने त्यांचे मृतदेह काळे निळे पडले होते. पोलिसांनी या दोघांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 30, 2012 03:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close