S M L

पंतप्रधांनाना धक्का, खाण वाटपाची सीबीआय चौकशी

31 मेकोळसा खाण वाटपात झालेल्या गैरव्यवहाराचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. केंद्रीय दक्षता आयोगाने ही शिफारस केली. 2006 ते 2009 या काळात झालेल्या कोळसा खाण वाटपात गैरव्यवहार झाल्याचा ठपका कॅगने ठेवला होता. भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी याबाबत केंद्रीय दक्षता आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत केंद्रीय दक्षता आयोगाने सीबीआयकडे तपासाची शिफारस केली. या काळात कोळसा मंत्रालय पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे होतं. टीम अण्णांनीही या काळात झालेल्या कोळसा खाण वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. या मुद्द्यावरुन त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाच लक्ष केल्यानं वाद सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 31, 2012 04:53 PM IST

पंतप्रधांनाना धक्का, खाण वाटपाची सीबीआय चौकशी

31 मे

कोळसा खाण वाटपात झालेल्या गैरव्यवहाराचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. केंद्रीय दक्षता आयोगाने ही शिफारस केली. 2006 ते 2009 या काळात झालेल्या कोळसा खाण वाटपात गैरव्यवहार झाल्याचा ठपका कॅगने ठेवला होता. भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी याबाबत केंद्रीय दक्षता आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत केंद्रीय दक्षता आयोगाने सीबीआयकडे तपासाची शिफारस केली. या काळात कोळसा मंत्रालय पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे होतं. टीम अण्णांनीही या काळात झालेल्या कोळसा खाण वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. या मुद्द्यावरुन त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाच लक्ष केल्यानं वाद सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 31, 2012 04:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close