S M L

स्विमिंग पूलमध्ये बुडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

04 जूनमुंबईत गोरेगावमधल्या ओझोन क्लबमध्ये असलेल्या स्विमिंग पूलमध्ये काल एका मुलाचा मृत्यू झाला. आर्यन परब असं या मुलाचं नाव असून तो 7 वर्षांचा होता. ओझोन क्लबमध्ये सध्या उन्हाळी प्रशिक्षण वर्ग सुरू आहे त्यात आर्यन येत होता. रविवारी संध्याकाळी तो सराव करत असताना खोल पाण्यात गेला आणि तिथंच त्याचा मृत्यू झाला. यावेळी त्याचे ट्रेनरही उपस्थित होते. मात्र आर्यन खोल पाण्यात गेला हे कुणाला कळालेच नाही. जेव्हा आर्यन बुडत असल्याचं समजलं, त्यावेळी त्याला बाहेर काढून हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलं. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. क्लबमध्ये प्रथमोपचाराची सुविधा नव्हती असा आरोप आर्यनच्या नातेवाईकांनी केला. तर पोलिसांनी क्लब विरूध्द गुन्हा नोंदवून दोघांना ताब्यात घेतलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 4, 2012 08:25 AM IST

स्विमिंग पूलमध्ये बुडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

04 जून

मुंबईत गोरेगावमधल्या ओझोन क्लबमध्ये असलेल्या स्विमिंग पूलमध्ये काल एका मुलाचा मृत्यू झाला. आर्यन परब असं या मुलाचं नाव असून तो 7 वर्षांचा होता. ओझोन क्लबमध्ये सध्या उन्हाळी प्रशिक्षण वर्ग सुरू आहे त्यात आर्यन येत होता. रविवारी संध्याकाळी तो सराव करत असताना खोल पाण्यात गेला आणि तिथंच त्याचा मृत्यू झाला. यावेळी त्याचे ट्रेनरही उपस्थित होते. मात्र आर्यन खोल पाण्यात गेला हे कुणाला कळालेच नाही. जेव्हा आर्यन बुडत असल्याचं समजलं, त्यावेळी त्याला बाहेर काढून हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलं. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. क्लबमध्ये प्रथमोपचाराची सुविधा नव्हती असा आरोप आर्यनच्या नातेवाईकांनी केला. तर पोलिसांनी क्लब विरूध्द गुन्हा नोंदवून दोघांना ताब्यात घेतलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 4, 2012 08:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close