S M L

भ्रूणहत्या प्रकरणी शिवाजी सानपाचा पर्दाफाश

04 जूनबीड :- तीन स्त्री अर्भकांचा बळी घेणार्‍या डॉ शिवाजी सानपला 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पण पोलीस चौकशीला सुरुवात करण्याआधीच आयबीएन लोकमतच्या हाती डॉ. सानप गर्भलिंग निदान करत असल्याचा पुरावा लागला आहे. डॉ. शिवाजी सानप याच्या हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान करायला आलेल्या एका महिलेनंच तशी कबुली दिली आहे. या महिलेचा कबुली दिलेला व्हिडिओआयबीएन लोकमतच्या हाती लागला आहे. ज्या महिलेनंही कबुली दिली आहे ती मुंबईहून बीडमध्ये गर्भलिंग निदान करण्यासाठी आली आहे. या महिलेला दोन मुली आहेत एक 3 वर्षांची तर एक 11 महिन्यांची आहे. दोन्ही मुली असल्यामुळे तिसरी मुलगी आहे की मुलगा आहे हे तपासण्यासाठी सानप यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. डॉक्टरांनी या महिलेची सोनोग्राफी केली आहे. पण रिपोर्टमध्ये काय आहे हे या महिलेला सांगण्यात आले नाही तर तिच्या सासर्‍यांना याबद्दल माहिती देण्यात आली असंही या महिलेनं सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 4, 2012 12:48 PM IST

भ्रूणहत्या प्रकरणी शिवाजी सानपाचा पर्दाफाश

04 जून

बीड :- तीन स्त्री अर्भकांचा बळी घेणार्‍या डॉ शिवाजी सानपला 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पण पोलीस चौकशीला सुरुवात करण्याआधीच आयबीएन लोकमतच्या हाती डॉ. सानप गर्भलिंग निदान करत असल्याचा पुरावा लागला आहे. डॉ. शिवाजी सानप याच्या हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान करायला आलेल्या एका महिलेनंच तशी कबुली दिली आहे. या महिलेचा कबुली दिलेला व्हिडिओआयबीएन लोकमतच्या हाती लागला आहे. ज्या महिलेनंही कबुली दिली आहे ती मुंबईहून बीडमध्ये गर्भलिंग निदान करण्यासाठी आली आहे. या महिलेला दोन मुली आहेत एक 3 वर्षांची तर एक 11 महिन्यांची आहे. दोन्ही मुली असल्यामुळे तिसरी मुलगी आहे की मुलगा आहे हे तपासण्यासाठी सानप यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. डॉक्टरांनी या महिलेची सोनोग्राफी केली आहे. पण रिपोर्टमध्ये काय आहे हे या महिलेला सांगण्यात आले नाही तर तिच्या सासर्‍यांना याबद्दल माहिती देण्यात आली असंही या महिलेनं सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 4, 2012 12:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close