S M L

चॅम्पियन्स लीग टी-20 यंदा दक्षिण आफ्रिकेत

01 जूनचॅम्पियन्स लीग टी-20 क्रिकेट स्पर्धा यंदा भारताऐवजी दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात येणार आहे. चेन्नईत झालेल्या चॅम्पियन्स लीगच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ऑक्टोबरमध्ये होणार्‍या या स्पर्धेदरम्यान भारतात अनेक अडचणी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. ऑक्टोबर महिन्यात भारतात पावसाळी वातारण असतं. त्याचबरोबर दुर्गापूजा महोत्सवामुळे कोलकात्यात एकही मॅच आयोजित करण्यात येणार नाही, असं आयोजकांचं म्हणणं आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाला याबाबत माहिती देण्यात आली असून त्यांच्याकडून होकार आला की यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. दरम्यान, या स्पर्धेत भारताच्या चार टीमचा समावेश करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 1, 2012 02:42 PM IST

चॅम्पियन्स लीग टी-20 यंदा दक्षिण आफ्रिकेत

01 जून

चॅम्पियन्स लीग टी-20 क्रिकेट स्पर्धा यंदा भारताऐवजी दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात येणार आहे. चेन्नईत झालेल्या चॅम्पियन्स लीगच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ऑक्टोबरमध्ये होणार्‍या या स्पर्धेदरम्यान भारतात अनेक अडचणी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. ऑक्टोबर महिन्यात भारतात पावसाळी वातारण असतं. त्याचबरोबर दुर्गापूजा महोत्सवामुळे कोलकात्यात एकही मॅच आयोजित करण्यात येणार नाही, असं आयोजकांचं म्हणणं आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाला याबाबत माहिती देण्यात आली असून त्यांच्याकडून होकार आला की यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. दरम्यान, या स्पर्धेत भारताच्या चार टीमचा समावेश करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2012 02:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close