S M L

'शोले' 15 ऑगस्टला होणार रिलीज

04 जूनजय-वीरुची दोस्ती, टांगेवाली बसंती, ठाकूरसाब आणि गब्बरसिंगसह त्याची फौज पुन्हा एकदा मोठ्यापडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज होतेय. रमेश सिप्पी यांचा शोले सुपरडुपर हिट सिनेमा येत्या 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. आणि तोही थ्रीडीमध्ये पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा एकूण एक हजार स्क्रीन्सवर दाखवण्यात येणार आहे. यासाठी 25 कोटींची गुंतवणूक केली गेली आहे. सुभाष घई आणि केतन मेहता माया डिजिटलचे 150 तंत्रज्ञ या सिनेमासाठी 3 डीवर काम करत आहे. त्यांच्या जोडीला हॉलिवूडची टीमही हातभार लावत आहे. 1975 साली शोले 15 ऑगस्टलाच रिलीज झाला होता. त्यामुळे 3 डी शोलेही येत्या स्वातंत्र्यदिनी रिलीज होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 4, 2012 01:03 PM IST

'शोले' 15 ऑगस्टला होणार रिलीज

04 जून

जय-वीरुची दोस्ती, टांगेवाली बसंती, ठाकूरसाब आणि गब्बरसिंगसह त्याची फौज पुन्हा एकदा मोठ्यापडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज होतेय. रमेश सिप्पी यांचा शोले सुपरडुपर हिट सिनेमा येत्या 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. आणि तोही थ्रीडीमध्ये पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा एकूण एक हजार स्क्रीन्सवर दाखवण्यात येणार आहे. यासाठी 25 कोटींची गुंतवणूक केली गेली आहे. सुभाष घई आणि केतन मेहता माया डिजिटलचे 150 तंत्रज्ञ या सिनेमासाठी 3 डीवर काम करत आहे. त्यांच्या जोडीला हॉलिवूडची टीमही हातभार लावत आहे. 1975 साली शोले 15 ऑगस्टलाच रिलीज झाला होता. त्यामुळे 3 डी शोलेही येत्या स्वातंत्र्यदिनी रिलीज होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 4, 2012 01:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close