S M L

राज्यात 49 हॉस्पिटल,डॉक्टरांची मान्यता होणार रद्द ?

05 जूनराज्यभरात 49 हॉस्पिटल्सवर स्त्रीभ्रूण हत्येबाबतच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद झाली आहेत. मात्र त्यावर अजून कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे या 49 हॉस्पिटल्स आणि डॉक्टर्सची मान्यता रद्द करण्याबाबतही आरोग्य विभाग विचार करत आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यात गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या अनेक घटना उघडकीला येत आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात खासगी सोनोग्राफी सेंटर्सवर बंदी घालण्याचा विचार सरकार करतंय. आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्यासोबत बैठक घेतली. त्यात जिल्ह्यात खासगी सोनोग्राफी सेंटर्सवर बंदी घालण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. 8 जूनला इंडियन मेडिकल काऊन्सिल आणि महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल यांच्यासोबत एक बैठक होणार आहे. त्यात या दोन मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्यानंतर सरकारी स्तरावर निर्णय होईल. सेकंड हँड सोनोग्राफी मशिन्सच्या खरेदी-विक्रीवर नियंत्रण घालण्याबाबतही आरोग्य विभाग विचार करतं आहे. बघूया कोणत्या जिल्ह्यात किती डॉक्टर्सवर कारवाईचा प्रस्ताव आहेपुणे - 14मुंबई - 2बीड - 4सातारा - 3कोल्हापूर - 3सांगली - 5उस्मानाबाद - 3नांदेड - 2सोलापूर - 4जळगाव - 1रायगड - 2अहमदनगर - 3

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 5, 2012 09:08 AM IST

राज्यात 49 हॉस्पिटल,डॉक्टरांची मान्यता होणार रद्द ?

05 जून

राज्यभरात 49 हॉस्पिटल्सवर स्त्रीभ्रूण हत्येबाबतच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद झाली आहेत. मात्र त्यावर अजून कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे या 49 हॉस्पिटल्स आणि डॉक्टर्सची मान्यता रद्द करण्याबाबतही आरोग्य विभाग विचार करत आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यात गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या अनेक घटना उघडकीला येत आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात खासगी सोनोग्राफी सेंटर्सवर बंदी घालण्याचा विचार सरकार करतंय. आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्यासोबत बैठक घेतली. त्यात जिल्ह्यात खासगी सोनोग्राफी सेंटर्सवर बंदी घालण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. 8 जूनला इंडियन मेडिकल काऊन्सिल आणि महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल यांच्यासोबत एक बैठक होणार आहे. त्यात या दोन मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्यानंतर सरकारी स्तरावर निर्णय होईल. सेकंड हँड सोनोग्राफी मशिन्सच्या खरेदी-विक्रीवर नियंत्रण घालण्याबाबतही आरोग्य विभाग विचार करतं आहे.

बघूया कोणत्या जिल्ह्यात किती डॉक्टर्सवर कारवाईचा प्रस्ताव आहे

पुणे - 14मुंबई - 2बीड - 4सातारा - 3कोल्हापूर - 3सांगली - 5उस्मानाबाद - 3नांदेड - 2सोलापूर - 4जळगाव - 1रायगड - 2अहमदनगर - 3

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2012 09:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close