S M L

सुनील तटकरे वादाच्या भोवर्‍यात

05 जूनराज्यातील जलसिंचनाचे प्रकल्प एकीकडे वादात असताना आता खुद्द जलसंपदा मंत्री सुनील तटकरे स्वत:च वादात सापडले आहेत. त्यांचा मुलगा, मुलगी, सून आणि काही कर्मचार्‍यांच्या नावावर तब्बल 140 कंपन्या स्थापन करण्यात आल्याची माहिती आयबीएन लोकमतच्या हाती लागली आहेत. कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रीकडूनच याबाबतची माहिती उपलब्ध झालीय. विशेष म्हणजे या कंपन्या तटकरे मंत्री असतानाच्या काळात उघडण्यात आल्या आहेत. त्यामुळे तटकरे यांनी पदाचा गैरवापर करुन या कंपन्या मिळवून दिल्याचा आरोप होतोय. केवळ कंपन्या स्थापन करून हे सर्व जण थांबले नाहीत, तर या कंपन्यांच्या नावावर शेकडो एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तटकरे यांचा मतदारसंघ असलेल्या रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन आणि रोहा तालुक्यात या जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तटकरे यांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी विरोधक करत आहेत. सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे ज्या कंपन्यांचे संचालक आहेत त्या सर्व कंपन्यांची माहिती मिनिस्ट्री ऑफ कंपनी अफेअर्सच्या वेबसाईटवरुन पडताळण्यात आलेली आहे. ही यादी बघितल्यावर लक्षात येतं की, रिअल इस्टेट, डेअरी, हॉटेल्स, फिशरीज अशा सर्व क्षेत्रात या कंपन्या उभारण्यात आलेल्या आहेत. या कंपन्यांच्या मार्फत जमीन खरेदीचा मोठा व्यवहार गेल्या तीन-चार वर्षात झालेला आहे, असा आरोप होत आहे. मुख्य म्हणजे मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी ही सुनील तटकरे यांच्या मंत्रीपदाच्या काळात झालेली आहे. अनिकेत तटकरेच्या नावे 25 कंपन्या1 : मल्टीव्हेंचर फायनान्शियल सर्व्हिसेस प्रा. लि. 2 : मल्टीव्हेंचर प्रॉपर्टीज प्रा. लि.3 : मल्टीव्हेंचर ऍग्रो ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. 4 : मल्टीव्हेंचर इस्टेट प्रा. लि.5 : मल्टीव्हेंचर हॉटेल्स प्रा. लि.6 : मल्टीव्हेंचर फिशरीज ऍण्ड मेरीटाईम प्रा. लि.7 : गीतामृत डेअरी प्रा. लि.8 : गीतामृत हॉटेल ऍण्ड रिसॉर्टस प्रा. लि.9 : गीतामृत ऍग्रो इस्टेट प्रा. लि.10 : गीता ऍग्रो ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.11 : स्वर्गामृत डेअरी प्रा. लि.12 : स्वर्गामृत ऍग्रो इस्टेट प्रा. लि.13 : सी ग्रीन हॉटेल्स ऍण्ड रिसॉर्टस प्रा. लि. 14 : टॅलेंट ऍग्रो ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.15 : कार्नेशन ऍग्रो इस्टेट प्रा. लि.16 : मॉडर्न इंडिया फ्री ट्रेड वेअर-हाऊसिंग प्रा. लि.17 : सिद्धीविनायक बिल्ट होम स्पेशालिटीज प्रा. लि.18 : वरद विनायक इन्फोकॉन प्रा. लि.19 : स्पुटनिक ऍग्रो ऍण्ड रिसोर्टस प्रा. लि. 20 : अनि हॉटेल्स प्रा. लि. 21 : माझदा कन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि.22 : ब्ल्यू स्ट्रीम प्रॉपर्टीज प्रा. लि.23 : नेक्स्ट टेक्नॉलॉजी (इं.) प्रा. लि.24 : बे ट्री ऍग्री फार्म्स प्रा. लि. 25 : ऍपल बेरी ऍग्रोटेक प्रा. लि. फक्त अनिकेत तटकरेच नाही तर सुनील तटकरे यांची मुलगी आणि सून यासुध्दा या पंचवीस कंपन्यांमधल्या काही कंपन्यांमध्ये संचालकपदावर आहेत. यापैकी अनिकेत तटकरे यांच्या पत्नी वेदांती तटकरे यांच्या कंपन्यांची माहिती...- सुनील तटकरे यांची सून वेदांती अनिकेत तटकरे 15 कंपन्यांमध्ये संचालक- याशिवाय इतर 7 कंपन्यांमध्ये संचालकपदीया सात कंपन्या कोणत्या ?1 - ग्रीफिथ रिअल इस्टेट प्रा. लि.2 - ऑरेंज ट्री ऍग्रो इस्टेट प्रा. लि. 3 - स्नोड्रॉप ऍग्रो ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.4 - चिन्हेश्वर लँड प्रा. लि.5 - श्रेयस लँड प्रा. लि.6 - श्रावणी लँड प्रा. लि.7 - कॉईन लँड प्रा. लि.सुनील तटकरेंची मुलगी आदिती तटकरे ही कोणत्या कंपन्यांवर संचालक आहेसुनील तटकरे यांची मुलगी आदिती 25 पैकी 13 कंपन्यांमध्ये संचालकयाशिवाय स्नोड्रॉप ऍग्रो & इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीतही संचालकपदीतटकरे साम्राज्याचे भागीदारसुनील आणि अनिल तटकरेंचे पीए केशव सारंगेंचा मुलगा किरण सारंगे मनोज कृष्णकांत शिंदे : अनिकेतसाठी जमीन खरेदी व्यवहारात पॉवर ऑफ ऍटर्नीदिपक सिंघई : अनिकेतसाठी जमीन खरेदी व्यवहारात पॉवर ऑफ ऍटर्नीसुनील लोटके, गिरीश आमोणकर, अखिलेश जैन, विजयकुमार जटियाआयबीएन लोकमतचे तटकरेंना सवाल1. सुनील तटकरे यांच्या मंत्रीपदाच्या काळातच त्यांच्या निकटवर्तियांच्या कंपन्यांची भरभराट का आणि कशी झाली ?2. सुनील तटकरे पालकमंत्री असलेल्या रायगडमधल्याच जमिनी त्यांच्या मुलाने आणि इतर निकटवर्तियांनी कशा खरेदी केल्या ?3. शेतकर्‍यांवर जमिनी विकण्यासाठी दबाव आणला जातोय का ?4. शेखाडी इथे होत असलेल्या प्रकल्पाविषयी पालकमंत्री तटकरे तोंड उघडतील का ?5. तटकरे यांच्या निकटवर्तियांव्यतिरिक्त इतर कोणाच्याच कंपन्या का बहरल्या नाहीत ?6. शेकडोंच्या संख्येने रायगडमध्ये स्थापन झालेल्या या कंपन्यांमुळे स्थानिक विकास किती झाला ?7. कंपन्या आणि जमिनींच्या या व्यवहारात तटकरे यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे का ?

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 5, 2012 09:35 AM IST

सुनील तटकरे वादाच्या भोवर्‍यात

05 जून

राज्यातील जलसिंचनाचे प्रकल्प एकीकडे वादात असताना आता खुद्द जलसंपदा मंत्री सुनील तटकरे स्वत:च वादात सापडले आहेत. त्यांचा मुलगा, मुलगी, सून आणि काही कर्मचार्‍यांच्या नावावर तब्बल 140 कंपन्या स्थापन करण्यात आल्याची माहिती आयबीएन लोकमतच्या हाती लागली आहेत. कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रीकडूनच याबाबतची माहिती उपलब्ध झालीय. विशेष म्हणजे या कंपन्या तटकरे मंत्री असतानाच्या काळात उघडण्यात आल्या आहेत. त्यामुळे तटकरे यांनी पदाचा गैरवापर करुन या कंपन्या मिळवून दिल्याचा आरोप होतोय. केवळ कंपन्या स्थापन करून हे सर्व जण थांबले नाहीत, तर या कंपन्यांच्या नावावर शेकडो एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तटकरे यांचा मतदारसंघ असलेल्या रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन आणि रोहा तालुक्यात या जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तटकरे यांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी विरोधक करत आहेत.

सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे ज्या कंपन्यांचे संचालक आहेत त्या सर्व कंपन्यांची माहिती मिनिस्ट्री ऑफ कंपनी अफेअर्सच्या वेबसाईटवरुन पडताळण्यात आलेली आहे. ही यादी बघितल्यावर लक्षात येतं की, रिअल इस्टेट, डेअरी, हॉटेल्स, फिशरीज अशा सर्व क्षेत्रात या कंपन्या उभारण्यात आलेल्या आहेत. या कंपन्यांच्या मार्फत जमीन खरेदीचा मोठा व्यवहार गेल्या तीन-चार वर्षात झालेला आहे, असा आरोप होत आहे. मुख्य म्हणजे मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी ही सुनील तटकरे यांच्या मंत्रीपदाच्या काळात झालेली आहे. अनिकेत तटकरेच्या नावे 25 कंपन्या

1 : मल्टीव्हेंचर फायनान्शियल सर्व्हिसेस प्रा. लि. 2 : मल्टीव्हेंचर प्रॉपर्टीज प्रा. लि.3 : मल्टीव्हेंचर ऍग्रो ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. 4 : मल्टीव्हेंचर इस्टेट प्रा. लि.5 : मल्टीव्हेंचर हॉटेल्स प्रा. लि.6 : मल्टीव्हेंचर फिशरीज ऍण्ड मेरीटाईम प्रा. लि.7 : गीतामृत डेअरी प्रा. लि.8 : गीतामृत हॉटेल ऍण्ड रिसॉर्टस प्रा. लि.9 : गीतामृत ऍग्रो इस्टेट प्रा. लि.10 : गीता ऍग्रो ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.11 : स्वर्गामृत डेअरी प्रा. लि.12 : स्वर्गामृत ऍग्रो इस्टेट प्रा. लि.13 : सी ग्रीन हॉटेल्स ऍण्ड रिसॉर्टस प्रा. लि. 14 : टॅलेंट ऍग्रो ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.15 : कार्नेशन ऍग्रो इस्टेट प्रा. लि.16 : मॉडर्न इंडिया फ्री ट्रेड वेअर-हाऊसिंग प्रा. लि.17 : सिद्धीविनायक बिल्ट होम स्पेशालिटीज प्रा. लि.18 : वरद विनायक इन्फोकॉन प्रा. लि.19 : स्पुटनिक ऍग्रो ऍण्ड रिसोर्टस प्रा. लि. 20 : अनि हॉटेल्स प्रा. लि. 21 : माझदा कन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि.22 : ब्ल्यू स्ट्रीम प्रॉपर्टीज प्रा. लि.23 : नेक्स्ट टेक्नॉलॉजी (इं.) प्रा. लि.24 : बे ट्री ऍग्री फार्म्स प्रा. लि. 25 : ऍपल बेरी ऍग्रोटेक प्रा. लि. फक्त अनिकेत तटकरेच नाही तर सुनील तटकरे यांची मुलगी आणि सून यासुध्दा या पंचवीस कंपन्यांमधल्या काही कंपन्यांमध्ये संचालकपदावर आहेत. यापैकी अनिकेत तटकरे यांच्या पत्नी वेदांती तटकरे यांच्या कंपन्यांची माहिती...

- सुनील तटकरे यांची सून वेदांती अनिकेत तटकरे 15 कंपन्यांमध्ये संचालक- याशिवाय इतर 7 कंपन्यांमध्ये संचालकपदी

या सात कंपन्या कोणत्या ?

1 - ग्रीफिथ रिअल इस्टेट प्रा. लि.2 - ऑरेंज ट्री ऍग्रो इस्टेट प्रा. लि. 3 - स्नोड्रॉप ऍग्रो ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.4 - चिन्हेश्वर लँड प्रा. लि.5 - श्रेयस लँड प्रा. लि.6 - श्रावणी लँड प्रा. लि.7 - कॉईन लँड प्रा. लि.

सुनील तटकरेंची मुलगी आदिती तटकरे ही कोणत्या कंपन्यांवर संचालक आहे

सुनील तटकरे यांची मुलगी आदिती 25 पैकी 13 कंपन्यांमध्ये संचालकयाशिवाय स्नोड्रॉप ऍग्रो & इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीतही संचालकपदीतटकरे साम्राज्याचे भागीदारसुनील आणि अनिल तटकरेंचे पीए केशव सारंगेंचा मुलगा किरण सारंगे मनोज कृष्णकांत शिंदे : अनिकेतसाठी जमीन खरेदी व्यवहारात पॉवर ऑफ ऍटर्नीदिपक सिंघई : अनिकेतसाठी जमीन खरेदी व्यवहारात पॉवर ऑफ ऍटर्नीसुनील लोटके, गिरीश आमोणकर, अखिलेश जैन, विजयकुमार जटिया

आयबीएन लोकमतचे तटकरेंना सवाल

1. सुनील तटकरे यांच्या मंत्रीपदाच्या काळातच त्यांच्या निकटवर्तियांच्या कंपन्यांची भरभराट का आणि कशी झाली ?2. सुनील तटकरे पालकमंत्री असलेल्या रायगडमधल्याच जमिनी त्यांच्या मुलाने आणि इतर निकटवर्तियांनी कशा खरेदी केल्या ?3. शेतकर्‍यांवर जमिनी विकण्यासाठी दबाव आणला जातोय का ?4. शेखाडी इथे होत असलेल्या प्रकल्पाविषयी पालकमंत्री तटकरे तोंड उघडतील का ?5. तटकरे यांच्या निकटवर्तियांव्यतिरिक्त इतर कोणाच्याच कंपन्या का बहरल्या नाहीत ?6. शेकडोंच्या संख्येने रायगडमध्ये स्थापन झालेल्या या कंपन्यांमुळे स्थानिक विकास किती झाला ?7. कंपन्या आणि जमिनींच्या या व्यवहारात तटकरे यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे का ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2012 09:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close