S M L

आला रे...पाऊस आला, मान्सून कोकणात

06 जूनगेल्या अनेक दिवसांपासून पाण्यासाठी व्याकुळलेल्या महाराष्ट्रवासियांना खुशखबर...अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. कोकण किनारपट्टीवर मान्सून पोहचला असून सिंधुदुर्गात पहिला पाऊस बरसत आहे. मात्र महाराष्ट्रात सर्वदुर पोहचण्यासाठी 48 तास लागणार आहे अशी माहिती पुणे वेधशाळेच्या संचालिका मेधा खोले यांनी दिली. तसेच काल मंगळवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. मंगलोर, संपूर्ण कर्नाटकचा किनारी भाग ओलांडून गोवा राज्य मान्सूनने पसरले आहे त्याचबरोबर कोकण आणि दक्षिण कोकणाच्या भाग मान्सूनने व्यापला आहे असं खोले यांनी सांगितलं. सिंधुदुर्ग पाठोपाठ सातारा,नांदेड येथेही पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. आज सकाळी मुंबईतील काही ठिकाणी रिमझिम पावसाने मुंबईकरांना दिलासा दिला. त्याचबरोबर ठाणे, पुण्यातही रिमझिम पावसाने हजेरी लावली. महाराष्ट्रात मान्सून पोहचण्यासाठी पाच ते सात दिवसांचा अवधी लागणार असल्याची शक्यता होती. मात्र हवामान अनुकूल असल्यामुळे मान्सूनची गाडी महाराष्ट्रात धडकली आहे. यंदाच्या वर्षी उन्हाचा उकाडा आणि दुष्काळाची परिस्थितीला सामोर जावं लागलेल्या महाराष्ट्रवासीयांना हा सुखद गारवा अजून 48 तासानंतर मनमुराद लुटता येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 6, 2012 11:25 AM IST

आला रे...पाऊस आला, मान्सून कोकणात

06 जून

गेल्या अनेक दिवसांपासून पाण्यासाठी व्याकुळलेल्या महाराष्ट्रवासियांना खुशखबर...अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. कोकण किनारपट्टीवर मान्सून पोहचला असून सिंधुदुर्गात पहिला पाऊस बरसत आहे. मात्र महाराष्ट्रात सर्वदुर पोहचण्यासाठी 48 तास लागणार आहे अशी माहिती पुणे वेधशाळेच्या संचालिका मेधा खोले यांनी दिली. तसेच काल मंगळवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. मंगलोर, संपूर्ण कर्नाटकचा किनारी भाग ओलांडून गोवा राज्य मान्सूनने पसरले आहे त्याचबरोबर कोकण आणि दक्षिण कोकणाच्या भाग मान्सूनने व्यापला आहे असं खोले यांनी सांगितलं. सिंधुदुर्ग पाठोपाठ सातारा,नांदेड येथेही पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. आज सकाळी मुंबईतील काही ठिकाणी रिमझिम पावसाने मुंबईकरांना दिलासा दिला. त्याचबरोबर ठाणे, पुण्यातही रिमझिम पावसाने हजेरी लावली. महाराष्ट्रात मान्सून पोहचण्यासाठी पाच ते सात दिवसांचा अवधी लागणार असल्याची शक्यता होती. मात्र हवामान अनुकूल असल्यामुळे मान्सूनची गाडी महाराष्ट्रात धडकली आहे. यंदाच्या वर्षी उन्हाचा उकाडा आणि दुष्काळाची परिस्थितीला सामोर जावं लागलेल्या महाराष्ट्रवासीयांना हा सुखद गारवा अजून 48 तासानंतर मनमुराद लुटता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 6, 2012 11:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close