S M L

सुनील तटकरेंचं साम्राज्य पुण्यातही पसरलं

06 जूनजलसंपदा मंत्री सुनील तटकरेंचं हे वादग्रस्त साम्राज्य कोकणापुरतंच मर्यादित नाही. हे साम्राज्य कोकणातून ताम्हिणी घाटाच्यावर म्हणजे पुण्यातही पसरलंय. केतन गोरानिया नावाच्या इसमाने 2 वर्षांपूर्वी पुण्यातल्या प्रसिध्द प्रबोध समुहाला शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यानं साडे तीन कोटी रुपयांचा गंडा घातला. जेव्हा या समुहानं गोरानियाकडे पैसे मागितले तेव्हा त्यानं तटकरेंचा माणूस असल्याचा दम भरला. विशेष म्हणजे 2 महिन्यांपूर्वी पुण्याजवळ वाकड इथे साडेदहा लाख स्केअर फूट जागेवर एका आलिशान हाऊसिंग प्रोजेक्टचं भुमिपूजन झालं. हा प्रोजेक्ट गोरानिया साकारतो. आणि या प्रोजेक्टमध्ये सुनील तटकरेंचा मुलगा अनिकेत तटकरे यांची मल्टीव्हेंचर फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पार्टनर आहे. त्यामुळे तटकरेंवर होत असलेल्या आरोपांमध्ये आणखी एका आरोपाची भर पडली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 6, 2012 01:04 PM IST

06 जून

जलसंपदा मंत्री सुनील तटकरेंचं हे वादग्रस्त साम्राज्य कोकणापुरतंच मर्यादित नाही. हे साम्राज्य कोकणातून ताम्हिणी घाटाच्यावर म्हणजे पुण्यातही पसरलंय. केतन गोरानिया नावाच्या इसमाने 2 वर्षांपूर्वी पुण्यातल्या प्रसिध्द प्रबोध समुहाला शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यानं साडे तीन कोटी रुपयांचा गंडा घातला. जेव्हा या समुहानं गोरानियाकडे पैसे मागितले तेव्हा त्यानं तटकरेंचा माणूस असल्याचा दम भरला. विशेष म्हणजे 2 महिन्यांपूर्वी पुण्याजवळ वाकड इथे साडेदहा लाख स्केअर फूट जागेवर एका आलिशान हाऊसिंग प्रोजेक्टचं भुमिपूजन झालं. हा प्रोजेक्ट गोरानिया साकारतो. आणि या प्रोजेक्टमध्ये सुनील तटकरेंचा मुलगा अनिकेत तटकरे यांची मल्टीव्हेंचर फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पार्टनर आहे. त्यामुळे तटकरेंवर होत असलेल्या आरोपांमध्ये आणखी एका आरोपाची भर पडली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 6, 2012 01:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close