S M L

तटकरेंनी महसूल व्यवस्था बांधली दावणीला

05 जूनराज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत मुलगा, मुलगी, सून यांच्यासह काही निकटवर्तीयांना तब्बल 140 कंपन्या उघडून दिल्या. इतकंच नाही तर त्यासाठी आठशे एकर जागा विकत घेतली असा गंभीर आरोप होत आहे. सुनील तटकरे यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहे. पण सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे यंाच्या मल्टीव्हेंचर कंपनीसाठी जमीन खरेदी करताना महसूल व्यवस्था दावणीला बांधण्यात आली.अनिकेत तटकरेंसाठी जमीन खरेदी- अनिकेत तटकरे संचालक असणारी मल्टीव्हेंचर प्रा. लि. कंपनी- 23 गुंठे शेतजमीन खरेदी करण्याची परवानगी- कुठवहीवाट आणि शेतजमीन अधिनियम 63 अंतर्गत- अप्पर जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली- 25 मे 2009 रोजी परवानगी पत्रं दिलं- प्रत्यक्षात खरेदी खतं झाली 2 महिने आधी 27 एप्रिल 2009 ला- खरेदी खतं होण्याआधीच सातबारावर नावं चढली होती - नवे सातबारा तयार होते 4 मार्च 2009 ला- सर्वे नं 16/1 ब साठी ही परवानगी देण्यात आली- पण प्रत्यक्षात खरेदी झाली ती सर्वे नं 37 च्या जमिनीची- 23 गुंठे शेतजमिनीच्या खरेदीची परवानगी मिळाली- 5 हेक्टर 22 गुंठे जमिनीची खरेदी झाली- रजिस्ट्रार ऑफिसमध्ये कलेक्टरच्या सहीचं चुकीचं पत्र सादर - पत्राआधारे खरेदी प्रक्रियेची नोंदणी पूर्ण- रजिस्ट्रार ऑफिसमधूनही कोणताही आक्षेप घेण्यात आला नाही. पालकमंत्र्यांच्या प्रभाावामुळेच महसूलच्या संपूर्ण यंत्रणेने शेकडो हेक्टर जमीनीची खरेदीप्रक्रिया विनासायस कशी पूर्ण केली याचा हा एक ठोस पुरावा. आता तरी सुनील तटकरे या जमीन खरेदीबद्दल स्पष्टीकरण देतील का ?

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 6, 2012 09:39 AM IST

तटकरेंनी महसूल व्यवस्था बांधली दावणीला

05 जून

राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत मुलगा, मुलगी, सून यांच्यासह काही निकटवर्तीयांना तब्बल 140 कंपन्या उघडून दिल्या. इतकंच नाही तर त्यासाठी आठशे एकर जागा विकत घेतली असा गंभीर आरोप होत आहे. सुनील तटकरे यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहे. पण सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे यंाच्या मल्टीव्हेंचर कंपनीसाठी जमीन खरेदी करताना महसूल व्यवस्था दावणीला बांधण्यात आली.अनिकेत तटकरेंसाठी जमीन खरेदी

- अनिकेत तटकरे संचालक असणारी मल्टीव्हेंचर प्रा. लि. कंपनी- 23 गुंठे शेतजमीन खरेदी करण्याची परवानगी- कुठवहीवाट आणि शेतजमीन अधिनियम 63 अंतर्गत- अप्पर जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली- 25 मे 2009 रोजी परवानगी पत्रं दिलं- प्रत्यक्षात खरेदी खतं झाली 2 महिने आधी 27 एप्रिल 2009 ला- खरेदी खतं होण्याआधीच सातबारावर नावं चढली होती - नवे सातबारा तयार होते 4 मार्च 2009 ला- सर्वे नं 16/1 ब साठी ही परवानगी देण्यात आली- पण प्रत्यक्षात खरेदी झाली ती सर्वे नं 37 च्या जमिनीची- 23 गुंठे शेतजमिनीच्या खरेदीची परवानगी मिळाली- 5 हेक्टर 22 गुंठे जमिनीची खरेदी झाली- रजिस्ट्रार ऑफिसमध्ये कलेक्टरच्या सहीचं चुकीचं पत्र सादर - पत्राआधारे खरेदी प्रक्रियेची नोंदणी पूर्ण- रजिस्ट्रार ऑफिसमधूनही कोणताही आक्षेप घेण्यात आला नाही.

पालकमंत्र्यांच्या प्रभाावामुळेच महसूलच्या संपूर्ण यंत्रणेने शेकडो हेक्टर जमीनीची खरेदीप्रक्रिया विनासायस कशी पूर्ण केली याचा हा एक ठोस पुरावा. आता तरी सुनील तटकरे या जमीन खरेदीबद्दल स्पष्टीकरण देतील का ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 6, 2012 09:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close