S M L

'फिल्मसिटी'बद्दलची बैठक निर्णयाविना

06 जूनमुंबईतील गोरेगाव येथील फिल्मसिटीत मराठी मालिकांना 50 टक्के सवलतीबाबत आयबीएन लोकमतनं बातमी दाखवली होती. यानंतर आज सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांनी मराठी निर्माते, चित्रपट महामंडळ, भारतीय चित्रपट सेना, मनसे चित्रपट सेना आणि अभिनेते विक्रम गोखले यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत या सवलतीविषयी येत्या 15 दिवसांत निर्णय घेऊ असं आश्वासन सांस्कृतिक मंत्र्यांनी दिलं. पण त्याबातची कोणतीच लेखी नोंद न ठेवता केवळ तोंडी आश्वासन देण्याचं काम मंत्र्यांनी केलं. 15 दिवसांत मराठी मालिकांना अनुदान नाही दिलं तर आंदोलन करू असा इशारा शिवसेनेने दिला आहे. मुंबईतल्या गोरेगावची चित्रनगरी दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणून ओळखली जाते. 1977 मध्ये स्थापन झालेल्या या चित्रनगरीत मात्र मराठी निर्मात्यांची गळचेपी होतेय. मालिकेच्या निर्मात्यांना या चित्रनगरीत शुटिंग करण्यासाठी 50 टक्के सवलत मिळते. पण ही सवलतच सरकारनं अचानक रद्द केल्यानं आणि अव्वाच्या सव्वा भाडे आकारल्यानं सध्या चित्रनगरीत उंच माझा झोका या केवळ एकाच मालिकेचं शुटिंग सुरु आहे. सरकारच्या या मनमानी धोरणामुळं ही मालिका तरी किती दिवस तग धरेल हा प्रश्न आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 6, 2012 04:19 PM IST

'फिल्मसिटी'बद्दलची बैठक निर्णयाविना

06 जून

मुंबईतील गोरेगाव येथील फिल्मसिटीत मराठी मालिकांना 50 टक्के सवलतीबाबत आयबीएन लोकमतनं बातमी दाखवली होती. यानंतर आज सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांनी मराठी निर्माते, चित्रपट महामंडळ, भारतीय चित्रपट सेना, मनसे चित्रपट सेना आणि अभिनेते विक्रम गोखले यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत या सवलतीविषयी येत्या 15 दिवसांत निर्णय घेऊ असं आश्वासन सांस्कृतिक मंत्र्यांनी दिलं. पण त्याबातची कोणतीच लेखी नोंद न ठेवता केवळ तोंडी आश्वासन देण्याचं काम मंत्र्यांनी केलं. 15 दिवसांत मराठी मालिकांना अनुदान नाही दिलं तर आंदोलन करू असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

मुंबईतल्या गोरेगावची चित्रनगरी दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणून ओळखली जाते. 1977 मध्ये स्थापन झालेल्या या चित्रनगरीत मात्र मराठी निर्मात्यांची गळचेपी होतेय. मालिकेच्या निर्मात्यांना या चित्रनगरीत शुटिंग करण्यासाठी 50 टक्के सवलत मिळते. पण ही सवलतच सरकारनं अचानक रद्द केल्यानं आणि अव्वाच्या सव्वा भाडे आकारल्यानं सध्या चित्रनगरीत उंच माझा झोका या केवळ एकाच मालिकेचं शुटिंग सुरु आहे. सरकारच्या या मनमानी धोरणामुळं ही मालिका तरी किती दिवस तग धरेल हा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 6, 2012 04:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close