S M L

रेल्वे पार्सल, लगेजच्या भाड्यात 25 टक्क्याने वाढ

05 जूनकेंद्र सरकारने पेट्रोलची दरवाढ केली असल्याची घटना ताजी असताना आता रेल्वे प्रशासनाने पार्सल आणि लगेजच्या भाड्यात मोठी वाढ केलीय. रेल्वे सूत्रांनुसार ही भाडेवाढ सुमारे 25 टक्के असून ती 1 जूनपासून लागू करण्यात येणार आहे. या भाडेवाढीमुळे छोटे व्यापारी आणि व्यावसायिकांना फटका बसणार आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून अनेक व्यापारी भाजीपाला, द्राक्षं, डाळिंब यांसह जीवनावश्यक वस्तू पार्सल आणि लगेच्या माध्यमातून मुंबईसह इतर शहरात आणि राज्यांत पाठवतात. त्यामुळे या भाडेवाढीचा फटका या छोट्या व्यापारांना बसणार आहे. त्यामुळे त्यांना तुलनेनं महागड्या ट्रक वाहतुकीकडे पुन्हा वळावे लागेल असं चित्र निर्माण झालंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 5, 2012 01:51 PM IST

रेल्वे पार्सल, लगेजच्या भाड्यात 25 टक्क्याने वाढ

05 जून

केंद्र सरकारने पेट्रोलची दरवाढ केली असल्याची घटना ताजी असताना आता रेल्वे प्रशासनाने पार्सल आणि लगेजच्या भाड्यात मोठी वाढ केलीय. रेल्वे सूत्रांनुसार ही भाडेवाढ सुमारे 25 टक्के असून ती 1 जूनपासून लागू करण्यात येणार आहे. या भाडेवाढीमुळे छोटे व्यापारी आणि व्यावसायिकांना फटका बसणार आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून अनेक व्यापारी भाजीपाला, द्राक्षं, डाळिंब यांसह जीवनावश्यक वस्तू पार्सल आणि लगेच्या माध्यमातून मुंबईसह इतर शहरात आणि राज्यांत पाठवतात. त्यामुळे या भाडेवाढीचा फटका या छोट्या व्यापारांना बसणार आहे. त्यामुळे त्यांना तुलनेनं महागड्या ट्रक वाहतुकीकडे पुन्हा वळावे लागेल असं चित्र निर्माण झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2012 01:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close