S M L

रामदेव बाबांना शरद पवारांचे समर्थन

06 जूनकाळ्या पैशाच्या मुद्यावर सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी बाबा रामदेव सर्वांच्या भेटी गाठी घेत आहेत. काल त्यानी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची भेट घेतली. यात पवारांनी बाबा रामदेवांना पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर बाबा रामदेव यांच्यावर स्तुतिसुमनंही उधळली. त्यामुळे राजकीय चर्चेला एक उधाण आलंय. काळ्या पैशाच्या मुद्यावर आंदोलन करून काँग्रेसला अडचणीत आणणार्‍या योगगुरू बाबा रामदेव यांनी काल केंद्रीय मंत्री शरद पवार यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर शर पवारांनी त्यांना दिलेला पाठिंबा या पवारांच्या गुगलीनं काँग्रेससह सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकलं आहे. अण्णा-बाबांच्या नादाला मी लागत नाही असं सांगणार्‍या शरद पवारांनी जनलोकपालच्या वेळी अण्णांना दूर ठेवलं पण बाबांना मात्र जवळ केलंय. त्यामुळे एकच राजकीय धुराळा उडालाय. पण पवार मात्र यात कसलंही राजकारण नसल्याचा दावा करताहेत. युपीएलता महत्वाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवल्याने बाबा रामदेवांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. एवढंच नाही तर त्यांना ही एक ऐतिहासिक घटना वाटतेय. काळ्या पैशाच्या मुद्द्यावरून काँग्रेसला वारंवार घायाळ करणार्‍या पवारांनी बाबा रामदेव यांना पाठिंबा देऊन काँग्रेसच्या जखमेवर मीठ तर चोळलंच, शिवाय अण्णांना चार हात दूर ठेवत बाबांना जवळ केल्यानं अण्णा बाबा युतीत फूट पाडण्याचाही प्रयत्न केला. पवारांच्या या बाऊंन्सरनंतर काँग्रेस आणि अण्णा काय करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 6, 2012 09:32 AM IST

रामदेव बाबांना शरद पवारांचे समर्थन

06 जूनकाळ्या पैशाच्या मुद्यावर सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी बाबा रामदेव सर्वांच्या भेटी गाठी घेत आहेत. काल त्यानी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची भेट घेतली. यात पवारांनी बाबा रामदेवांना पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर बाबा रामदेव यांच्यावर स्तुतिसुमनंही उधळली. त्यामुळे राजकीय चर्चेला एक उधाण आलंय.

काळ्या पैशाच्या मुद्यावर आंदोलन करून काँग्रेसला अडचणीत आणणार्‍या योगगुरू बाबा रामदेव यांनी काल केंद्रीय मंत्री शरद पवार यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर शर पवारांनी त्यांना दिलेला पाठिंबा या पवारांच्या गुगलीनं काँग्रेससह सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकलं आहे.

अण्णा-बाबांच्या नादाला मी लागत नाही असं सांगणार्‍या शरद पवारांनी जनलोकपालच्या वेळी अण्णांना दूर ठेवलं पण बाबांना मात्र जवळ केलंय. त्यामुळे एकच राजकीय धुराळा उडालाय. पण पवार मात्र यात कसलंही राजकारण नसल्याचा दावा करताहेत.

युपीएलता महत्वाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवल्याने बाबा रामदेवांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. एवढंच नाही तर त्यांना ही एक ऐतिहासिक घटना वाटतेय.

काळ्या पैशाच्या मुद्द्यावरून काँग्रेसला वारंवार घायाळ करणार्‍या पवारांनी बाबा रामदेव यांना पाठिंबा देऊन काँग्रेसच्या जखमेवर मीठ तर चोळलंच, शिवाय अण्णांना चार हात दूर ठेवत बाबांना जवळ केल्यानं अण्णा बाबा युतीत फूट पाडण्याचाही प्रयत्न केला. पवारांच्या या बाऊंन्सरनंतर काँग्रेस आणि अण्णा काय करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 6, 2012 09:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close