S M L

मराठवाड्यातल्या उद्योगावर मंदीचा परिणाम

25 नोव्हेंबर औरंगाबादसंजय वरकडजागतिक मंदीचा फटका आता मराठवाड्यातल्या उद्योगांनाही बसतोय. औंरगाबादच्या एमआयडीसीत बहुतांशी उद्योगांचं उत्पादन 25 ते 30% नी कमी झालं आहे. आता तर उद्योजक 5 दिवसांचा आठवडा करण्याच्या विचारात आहेत. मंदीच्या या संकटातून मार्ग शोधण्यासाठी या विषयावर औरंगाबादेतील उद्योजकांचं चर्चासत्र घेण्यात आलं. मंदीच्या भीतीमुळे काही चुकीचे निर्णय घेतले जात असल्याचा सूर या चर्चासत्रातून ऐकायला मिळाला. अजित रानडे आदित्य बिर्ला ग्रुपचे मुख्य अर्थतज्ञ सांगतात, रिझर्व बँकेनं व्याजाचे दर कमी केलेत. या स्थितीत छोट्या उद्योजकांना कर्ज मिळणार नाही. त्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत. त्यांना कर्ज व सवलती द्याव्यात अशा शिफारसी आम्ही केल्या आहेत. मंदीमुळे मराठवाड्यातील ऑटोमोबाईल्स, रिअल इस्टेट आणि आयटी क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम होत आहे. लोडशेडिंगही आता डोकेदुखीचा विषय बनला आहे. चंेबर ऑफ मराठवाडा इंडस्टिज अ‍ॅण्ड असोसएशनचे सचिव, मुकुंद कुलकर्णी सांगतात, इथे 60% ऑटोमोबाईल्स उद्योग आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या उद्योजकांवर परिणाम होत आहे. छोटे उद्योग अडचणीत आले आहेत. विजेचा प्रश्न असल्यानं आम्ही पाच दिवसांचा आठवडा करावा असा विचार करीत आहोत.जागतिक मंदी आणि लोडशेडिंगचा हा विषय मराठवाड्यातील उद्योगवाढीवर विपरित परिणाम करतोय. तसंच इथे येऊ घातलेल्या मोठया उद्योगांनाही त्याचा फटका बसू शकतो. आधीच लोडशेडिंगमुळे मेटाकुटीला आलेल्या मराठवाड्याच्या उद्योजकांच्या मानगुटीवर आता जागतिक मंदीच भूत बसलं आहे. हे भूत प्रत्यक्षात कुणी पाहिलं नाही, पण त्याच्या गोष्टी ऐकूनच मराठवाड्यातील उद्योजकांना भीती वाटत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 25, 2008 01:01 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 25, 2008 01:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close