S M L

जलसंपदा खात्याचे सादरीकरण पुढे ढकलले

06 जूनजलसिंचनावर जलसंपदा विभाग मंत्रिमंडळापुढे सादरीकरण देणार होते. पण हे सादरीकरण आता पुढे ढकलण्यात आलं आहे. वेळेअभावी सादरीकरण पुढे ढकलल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, या सादरीकरणातले महत्त्वाचे मुद्दे आयबीएन लोकमतच्या हाती लागले आहेत. आर्थिक पाहणी अहवालानुसार गेल्या दहा वर्षात 20 हजार कोटी रूपये खर्च करुन सिंचन क्षमता फक्त 0.1 टक्के वाढल्याचं समोर आलं होतं. पण ही क्षमता 0.1 नाही तर 5.6% वाढल्याचं जलसंपदा विभागाचं म्हणणं आहे. ऊस उत्पादनात वाढ झालीय. यावरून सिंचन समाधानकारक असल्याचं यात म्हटलंय. सरकारच्या धोरणानुसार पिण्याचे पाणी, उद्योगधंद्यांना पाणी, ऊर्जा प्रकल्प आणि शेती असा पाणीवाटपाचा क्रम आहे. तसं नसतं तरच शेतीची सिंचनक्षमता अधिक वाढली असती, असंही त्यात म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 6, 2012 05:45 PM IST

जलसंपदा खात्याचे सादरीकरण पुढे ढकलले

06 जून

जलसिंचनावर जलसंपदा विभाग मंत्रिमंडळापुढे सादरीकरण देणार होते. पण हे सादरीकरण आता पुढे ढकलण्यात आलं आहे. वेळेअभावी सादरीकरण पुढे ढकलल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, या सादरीकरणातले महत्त्वाचे मुद्दे आयबीएन लोकमतच्या हाती लागले आहेत. आर्थिक पाहणी अहवालानुसार गेल्या दहा वर्षात 20 हजार कोटी रूपये खर्च करुन सिंचन क्षमता फक्त 0.1 टक्के वाढल्याचं समोर आलं होतं. पण ही क्षमता 0.1 नाही तर 5.6% वाढल्याचं जलसंपदा विभागाचं म्हणणं आहे. ऊस उत्पादनात वाढ झालीय. यावरून सिंचन समाधानकारक असल्याचं यात म्हटलंय. सरकारच्या धोरणानुसार पिण्याचे पाणी, उद्योगधंद्यांना पाणी, ऊर्जा प्रकल्प आणि शेती असा पाणीवाटपाचा क्रम आहे. तसं नसतं तरच शेतीची सिंचनक्षमता अधिक वाढली असती, असंही त्यात म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 6, 2012 05:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close