S M L

आरटीआय अंतर्गत माहिती देण्यासाठी 16 लाखांची मागणी

07 जूनमाहितीच्या अधिकाराखाली एखादी माहिती मागवली तर ती देण्याकरता अवाजवी रक्कम मागण्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातील विहार दुर्वे यांना माहिती मिळवण्यासाठी तब्बल 16 लाख रुपये मागितले आहे. सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय हॉस्पिटलने 5 लाख 24 हजार 533 एवढ्या कागदांवर माहिती देण्याकरता ही रक्कम मागितली. दुर्वे यांनी मुंबईतील वैद्यकीय शिक्षण संचलनालयाकडे त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या शासकीय हॉस्पिटलमधील वैद्यकीय सुविधा, पेशंटची संख्या, पेंडिंग प्रपोजल्स, आजारपणात दगावलेल्या रूग्णांची संख्या, पेशंट्सच्या तक्रारींची संख्या आणि स्वरूप अशी माहिती मागितली होती. त्यानुसार राज्यातील शासकीय रूग्णालयांनी माहिती देण्यास सुरवात केली. नागपूरवरून फुकट, इतर काही ठिकाणांहून काही शे- हजारात ती पुरवण्यात आली पण सांगलीच्या हॉस्पिटलनं सांगितलेल्या रकमेनं दुर्वे यांचेच डोळे पांढरे व्हायची वेळ आली. माहिती नाकारण्याचाच हा प्रकार असून माहिती अधिकार्‍याचं हे उल्लंघन असल्याचं विहार दुर्वे यांचं म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 7, 2012 03:43 PM IST

आरटीआय अंतर्गत माहिती देण्यासाठी 16 लाखांची मागणी

07 जून

माहितीच्या अधिकाराखाली एखादी माहिती मागवली तर ती देण्याकरता अवाजवी रक्कम मागण्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातील विहार दुर्वे यांना माहिती मिळवण्यासाठी तब्बल 16 लाख रुपये मागितले आहे. सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय हॉस्पिटलने 5 लाख 24 हजार 533 एवढ्या कागदांवर माहिती देण्याकरता ही रक्कम मागितली. दुर्वे यांनी मुंबईतील वैद्यकीय शिक्षण संचलनालयाकडे त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या शासकीय हॉस्पिटलमधील वैद्यकीय सुविधा, पेशंटची संख्या, पेंडिंग प्रपोजल्स, आजारपणात दगावलेल्या रूग्णांची संख्या, पेशंट्सच्या तक्रारींची संख्या आणि स्वरूप अशी माहिती मागितली होती. त्यानुसार राज्यातील शासकीय रूग्णालयांनी माहिती देण्यास सुरवात केली. नागपूरवरून फुकट, इतर काही ठिकाणांहून काही शे- हजारात ती पुरवण्यात आली पण सांगलीच्या हॉस्पिटलनं सांगितलेल्या रकमेनं दुर्वे यांचेच डोळे पांढरे व्हायची वेळ आली. माहिती नाकारण्याचाच हा प्रकार असून माहिती अधिकार्‍याचं हे उल्लंघन असल्याचं विहार दुर्वे यांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 7, 2012 03:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close