S M L

पुणे मेट्रोला हिरवा कंदील

07 जूनपुण्यातील रहदारीवर तोडगा काढण्यासाठी अखेर मेट्रोला अनेक वाद आणि चर्चेनंतर मंजुरी मिळाली आहे. काल झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत मेट्रोला मंजुरी देण्यात आली. वनाझ ते रामवाडी या मार्गावर एलीव्हेटेड मेट्रो करण्याला मंजुरी देण्यात आली. येत्या पाच वर्षांमध्ये आता हा मेट्रोचा प्रकल्प पूर्ण होईल. या मेट्रोसाठी पन्नास टक्के रक्कम महापालिका,राज्य व केंद्र सरकार उभारणार आहे. यातले 10 टक्के महापालिका,20 टक्के राज्य शासन तर उरलेले 20 टक्के केंद्र सरकारकडून उभारले जाणार आहेत. तर उरलेली 50 टक्के रक्कम ही खासगी क्षेत्रामधून उभारली जाणार आहे. मेट्रो भुयारी असावी की एलीव्हेडेड या वादावर देखिल यामुळे पडदा पडला आहे. पहिला टप्प्यामध्ये वनाझ ते रामवाडी या 15 किलोमिटरच्या मार्गावर ही मेट्रो उभारली जाणार आहे. यासाठी एकूण 2 हजार 593 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एकूणच पाच वर्षांचा कालावधी आणि मेट्रोसाठी खर्चाची रक्कम गोळा करण्यासाठी तीन वेगवेगळी मार्ग यामुळे समन्वय कसा साधला जाणार हाच मोठा प्रश्न आहे. मेट्रो रेल्वेची वैशिष्ट्यंपहिला टप्पा वनाझ ते रामवाडीपाच वर्षांमध्ये पहिला टप्पा पूर्णमेट्रोला चार ते सहा डबेएक हजार प्रवासी क्षमतादर पाच ते बारा मिनिटांनी मेट्रो धावणारकिमान तिकीट 7 तर कमाल 15 रुपये

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 7, 2012 12:57 PM IST

पुणे मेट्रोला हिरवा कंदील

07 जून

पुण्यातील रहदारीवर तोडगा काढण्यासाठी अखेर मेट्रोला अनेक वाद आणि चर्चेनंतर मंजुरी मिळाली आहे. काल झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत मेट्रोला मंजुरी देण्यात आली. वनाझ ते रामवाडी या मार्गावर एलीव्हेटेड मेट्रो करण्याला मंजुरी देण्यात आली. येत्या पाच वर्षांमध्ये आता हा मेट्रोचा प्रकल्प पूर्ण होईल. या मेट्रोसाठी पन्नास टक्के रक्कम महापालिका,राज्य व केंद्र सरकार उभारणार आहे. यातले 10 टक्के महापालिका,20 टक्के राज्य शासन तर उरलेले 20 टक्के केंद्र सरकारकडून उभारले जाणार आहेत. तर उरलेली 50 टक्के रक्कम ही खासगी क्षेत्रामधून उभारली जाणार आहे. मेट्रो भुयारी असावी की एलीव्हेडेड या वादावर देखिल यामुळे पडदा पडला आहे. पहिला टप्प्यामध्ये वनाझ ते रामवाडी या 15 किलोमिटरच्या मार्गावर ही मेट्रो उभारली जाणार आहे. यासाठी एकूण 2 हजार 593 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एकूणच पाच वर्षांचा कालावधी आणि मेट्रोसाठी खर्चाची रक्कम गोळा करण्यासाठी तीन वेगवेगळी मार्ग यामुळे समन्वय कसा साधला जाणार हाच मोठा प्रश्न आहे.

मेट्रो रेल्वेची वैशिष्ट्यं

पहिला टप्पा वनाझ ते रामवाडीपाच वर्षांमध्ये पहिला टप्पा पूर्णमेट्रोला चार ते सहा डबेएक हजार प्रवासी क्षमतादर पाच ते बारा मिनिटांनी मेट्रो धावणारकिमान तिकीट 7 तर कमाल 15 रुपये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 7, 2012 12:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close