S M L

मुंबईत 3 स्त्री अर्भकांची हत्या

08 जूनराज्यात एकापाठोपाठ स्त्री अर्भकांची हत्या होण्याच्या घटनांमुळे एकच हादरा बसला आहे. पण आता राज्याच्या राजधानीतच तब्बल तीन स्त्री भ्रूण हत्येचं प्रकरण उघडकीस आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील कुर्ल्यात 2 भ्रूण सापडली यात एक चार महिन्याचं तर दुसरं 2 महिन्याचं आहे. कुर्ल्यातील मनपा शाळेजवळ ही दोन 2 स्त्री भ्रूणं सापडली आहे. या संदर्भात विनोबा भावेनगर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. यासाठी 4 पथक कुर्ला भागातील हॉस्पिटलची तपासणी करताहेत. तर दुसर्‍या घटनेत खारमध्येही एका नवजात स्त्री अर्भकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. या नवजात स्त्रीअर्भकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणाबद्दल खार पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 8, 2012 11:44 AM IST

मुंबईत 3 स्त्री अर्भकांची हत्या

08 जून

राज्यात एकापाठोपाठ स्त्री अर्भकांची हत्या होण्याच्या घटनांमुळे एकच हादरा बसला आहे. पण आता राज्याच्या राजधानीतच तब्बल तीन स्त्री भ्रूण हत्येचं प्रकरण उघडकीस आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील कुर्ल्यात 2 भ्रूण सापडली यात एक चार महिन्याचं तर दुसरं 2 महिन्याचं आहे. कुर्ल्यातील मनपा शाळेजवळ ही दोन 2 स्त्री भ्रूणं सापडली आहे. या संदर्भात विनोबा भावेनगर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. यासाठी 4 पथक कुर्ला भागातील हॉस्पिटलची तपासणी करताहेत. तर दुसर्‍या घटनेत खारमध्येही एका नवजात स्त्री अर्भकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. या नवजात स्त्रीअर्भकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणाबद्दल खार पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2012 11:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close