S M L

स्त्री भ्रूण हत्येप्रकरणी महिला डॉक्टर गजाआड

08 जूनधुळे शहराजवळच्या बिलाडी गावात स्त्री भ्रूण हत्येप्रकरणी डॉ. पायल सिंघवीला अटक करण्यात आली आहे. आज पहाटे तिला अटक करण्यात आली आहे. आणि तिच्या सोनोग्राफी सेंटरचा परवानाही तातडीनं रद्द करण्यात आला आहे. त्याचबरोबर संबंधित महिलेच्या पतीला आणि कुटुंबीयांनाही अटक करण्यात आली. एका निनावी तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी हा तपास केला. सिंघवीच्या सेंटरमध्ये 9 जानेवारी 2011 रोजी ही स्त्री भ्रूण हत्या झाली होती. गर्भलिंग निदान करणार्‍या मीनल खलाणे या महिलेचाही तपास सुरू आहे. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या डॉ. पायल सिंघवीला 12 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 8, 2012 12:02 PM IST

स्त्री भ्रूण हत्येप्रकरणी महिला डॉक्टर गजाआड

08 जून

धुळे शहराजवळच्या बिलाडी गावात स्त्री भ्रूण हत्येप्रकरणी डॉ. पायल सिंघवीला अटक करण्यात आली आहे. आज पहाटे तिला अटक करण्यात आली आहे. आणि तिच्या सोनोग्राफी सेंटरचा परवानाही तातडीनं रद्द करण्यात आला आहे. त्याचबरोबर संबंधित महिलेच्या पतीला आणि कुटुंबीयांनाही अटक करण्यात आली. एका निनावी तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी हा तपास केला. सिंघवीच्या सेंटरमध्ये 9 जानेवारी 2011 रोजी ही स्त्री भ्रूण हत्या झाली होती. गर्भलिंग निदान करणार्‍या मीनल खलाणे या महिलेचाही तपास सुरू आहे. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या डॉ. पायल सिंघवीला 12 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2012 12:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close