S M L

अर्भकांची हत्या करणार्‍या 5 डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन रद्द

08 जूनराज्यात होणार्‍या स्त्री भ्रूण हत्यांची दखल घेतल मेडिकल काऊंसिल ऑफ इंडियाने कडक कारवाईला सुरुवात केली आहे. राज्यातील 5 डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन रद्द तर 18 डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मेडिकल काऊंसिल ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात 49 डॉक्टर आणि हॉस्पिटलवर स्त्री भ्रूण हत्येचा गुन्हा दाखल आहे. मात्र यावर आजपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. बीडमध्ये स्त्री भ्रूण हत्या उघडकीस आल्यामुळे खडबडून जागे झालेल्या काऊंसिलने 49 डॉक्टरांची यादी तयार केली. या सर्व डॉक्टर आणि हॉस्पिटलची मान्यता रद्द करण्यात येईल असे संकेत दिले होते अखेर कारवाईचा बडगा उगारत 5 डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात आली आहे पण अजून 44 जणांवर काय कारवाई होणार हा प्रश्न अजून बाकी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 8, 2012 12:41 PM IST

अर्भकांची हत्या करणार्‍या 5 डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन रद्द

08 जून

राज्यात होणार्‍या स्त्री भ्रूण हत्यांची दखल घेतल मेडिकल काऊंसिल ऑफ इंडियाने कडक कारवाईला सुरुवात केली आहे. राज्यातील 5 डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन रद्द तर 18 डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मेडिकल काऊंसिल ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात 49 डॉक्टर आणि हॉस्पिटलवर स्त्री भ्रूण हत्येचा गुन्हा दाखल आहे. मात्र यावर आजपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. बीडमध्ये स्त्री भ्रूण हत्या उघडकीस आल्यामुळे खडबडून जागे झालेल्या काऊंसिलने 49 डॉक्टरांची यादी तयार केली. या सर्व डॉक्टर आणि हॉस्पिटलची मान्यता रद्द करण्यात येईल असे संकेत दिले होते अखेर कारवाईचा बडगा उगारत 5 डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात आली आहे पण अजून 44 जणांवर काय कारवाई होणार हा प्रश्न अजून बाकी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2012 12:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close