S M L

मोदींच्या राज्यातच पोस्टरबाजी

10 जूनगुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या दबामुळे संजय जोशी यांनी भाजपला रामराम ठोकावा लागला मात्र मोदी आणि जोशी यांच्यातील अंतर्गत लढाई अजून सुरुच आहे. दिल्लीपाठोपाठ आज मोदींच्या राज्यातच जोशींच्या समर्थनात ' छोटे मनसे कोई बडा नही होता' अशा मजकूराची पोस्टर झळकली. एकीकडे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला तर दुसरीकडे पक्षातली दुफळी पुन्हा एकदा उघड झाली. राजकोटमध्ये गुजरात भाजपच्या कार्यकारिणीची बैठक होती. या सभेतच संजय जोशी समर्थकांनी नरेंद्र मोदींविरोधात पत्रकं वाटली. मोदींच्या दबावामुळेच जोशींना पक्षाचा राजीनामा द्यावा लागला होता. सौराष्ट्रामधल्या वर्तमान पत्रांमध्येही संजय जोशींच्या समर्थनात जाहिरात देण्यात आली होती. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोदी विरुद्ध जोशी हा वाद उफाळला. पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत मोदींनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. यावर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत भाजपचीच सत्ता येणार, असा विश्वास गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. गुजरात भाजपमध्ये गेली अनेक वर्ष काम करणार्‍या संजय जोशींच्या राजीनाम्यामुळे पक्षांतर्गत नाराजी पसरलीय. संघालाही हा निर्णय रूचलेला नाही. त्यामुळे मोदींविरोधी लॉबी आता सक्रीय झालीय. मोदींचे कट्टर विरोधक आणि भाजपचे ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांनी गोध्रामध्ये एका रॅलीला संबोधित करत शक्तीप्रदर्शन केलं. निवडणुकीला काही महिने शिल्लक असताना भाजपमध्ये सुरू झालेल्या अंतर्गत कलहामुळे काँग्रेसला आयतीच संधी मिळाली. नरेंद्र मोदींसाठी हा कसोटीचा काळ आहे. राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावण्याची त्यांची इच्छा आहे. पण त्यासाठी विधानसभा निवडणुकीत उत्तम कामगिरी करण्याचं आव्हान त्यांना पेलायचं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 10, 2012 12:43 PM IST

मोदींच्या राज्यातच पोस्टरबाजी

10 जून

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या दबामुळे संजय जोशी यांनी भाजपला रामराम ठोकावा लागला मात्र मोदी आणि जोशी यांच्यातील अंतर्गत लढाई अजून सुरुच आहे. दिल्लीपाठोपाठ आज मोदींच्या राज्यातच जोशींच्या समर्थनात ' छोटे मनसे कोई बडा नही होता' अशा मजकूराची पोस्टर झळकली. एकीकडे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला तर दुसरीकडे पक्षातली दुफळी पुन्हा एकदा उघड झाली.

राजकोटमध्ये गुजरात भाजपच्या कार्यकारिणीची बैठक होती. या सभेतच संजय जोशी समर्थकांनी नरेंद्र मोदींविरोधात पत्रकं वाटली. मोदींच्या दबावामुळेच जोशींना पक्षाचा राजीनामा द्यावा लागला होता. सौराष्ट्रामधल्या वर्तमान पत्रांमध्येही संजय जोशींच्या समर्थनात जाहिरात देण्यात आली होती. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोदी विरुद्ध जोशी हा वाद उफाळला.

पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत मोदींनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. यावर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत भाजपचीच सत्ता येणार, असा विश्वास गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. गुजरात भाजपमध्ये गेली अनेक वर्ष काम करणार्‍या संजय जोशींच्या राजीनाम्यामुळे पक्षांतर्गत नाराजी पसरलीय. संघालाही हा निर्णय रूचलेला नाही. त्यामुळे मोदींविरोधी लॉबी आता सक्रीय झालीय. मोदींचे कट्टर विरोधक आणि भाजपचे ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांनी गोध्रामध्ये एका रॅलीला संबोधित करत शक्तीप्रदर्शन केलं.

निवडणुकीला काही महिने शिल्लक असताना भाजपमध्ये सुरू झालेल्या अंतर्गत कलहामुळे काँग्रेसला आयतीच संधी मिळाली. नरेंद्र मोदींसाठी हा कसोटीचा काळ आहे. राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावण्याची त्यांची इच्छा आहे. पण त्यासाठी विधानसभा निवडणुकीत उत्तम कामगिरी करण्याचं आव्हान त्यांना पेलायचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 10, 2012 12:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close