S M L

वन खात्याची जमीन लाटल्याचा प्रकार उघडकीस

25 नोव्हेंबर पेणवनखात्याची रायगडमधल्या पेण तालुक्यातली 43 एकरांची जमीन सातबा-यात फेरफार करून लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. करोडो रुपयांची ही जमीन विकण्याची तयारी सुरु असताना माहितीच्या अधिकारात केलेल्या अर्जातून हे प्रकरण लोकांसमोर आलं आहे. पेण तालुक्यातल्या वडखळ वन परिक्षेत्रामधील मौजे महल मीरा सर्व्हे नंबर 19/0 गट नं. 158 क्षेत्र 16.3 हेक्टर या क्रमांकाची जमीन ही वनखात्याच्या मालकीची होती. पण जमिनीच्या सातबा-याच्या उता-यावरील वनखाते हे नाव कमी करून हबीब खोत यांनी जमीन आपल्या नावावर केली. पेणमधील वनखात्याचे कंत्राटदार इस्माईल टाक यांनी माहितीच्या अधिकारात केलेल्या अर्जामुळे ही जमीन वनखात्याची असल्याचं उघड झालं. हा प्रकार उघडकीला आल्यानं गावात एकच खळबळ उडाली. तहसिलदार, महसूल विभाग, तलाठी यांच्या संगनमताशिवाय असा प्रकार होणं शक्य नाही, असं आता वनखातं सांगत आहे.या प्रकरणाची वनपाल अधिकारी तसेच तहसिलदार यांनी चौकशी करणार असल्याचं सांगितलं. तर अर्जदार इस्माईल टाक या प्रकरणाची महसूलमंत्री नारायण राणेंच्या मार्फत चौकशी करावी अशी मागणी करणार आहेत. ही जमीन आपलीच आहे, शासनाला इतक्या उशिरा जाग कशी आली असा दावा करीत हबीब खोत यांनीही हायकोर्टात जाण्याची तयारी चालवली आहे.एकूणच या प्रकरणामुळे पेणमधल्या महसूल खातं, तहसिलदार आणि संबंधित सर्वच सरकारी अधिका-यांचं धाबं दणाणलं आहे. या प्रकरणातील दोषींवर नेमकी कारवाई होणार का हे आता काही दिवसात कळेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 25, 2008 02:29 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 25, 2008 02:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close