S M L

इंदू मिलसाठी रास्ता-रेल रोको

12 जूनमुंबईतील दादर येथील इंदू मिलची संपूर्ण साडेबारा एकर जागा राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्यात यावी या मागणीसाठी भीमसैनिकांनी दुसर्‍या दिवशीही आंदोलन केली. आज आरपीआय कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हात आंदोलन केलं. तर अंबरनाथ, शहाड आणि डोंबिवली येथे सीएसटीकडे जाणार्‍या लोकल रोखून धरल्यात. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांसह महिलांचाही मोठा संख्येनं सहभागी होत्या. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी सरकार चालढकल करत असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी अंबरनाथ परिसरात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे ठाण्यातल्या आनंदनगर चेक नाक्यावर रास्ता रोको केला. या आंदोलनामुळे ईस्टर्न एक्स्प्रेसवरील ट्रॅफीक जाम झाली. ठाण्यात विविध भागातून आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 12, 2012 09:21 AM IST

इंदू मिलसाठी रास्ता-रेल रोको

12 जून

मुंबईतील दादर येथील इंदू मिलची संपूर्ण साडेबारा एकर जागा राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्यात यावी या मागणीसाठी भीमसैनिकांनी दुसर्‍या दिवशीही आंदोलन केली. आज आरपीआय कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हात आंदोलन केलं. तर अंबरनाथ, शहाड आणि डोंबिवली येथे सीएसटीकडे जाणार्‍या लोकल रोखून धरल्यात. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांसह महिलांचाही मोठा संख्येनं सहभागी होत्या. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी सरकार चालढकल करत असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी अंबरनाथ परिसरात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे ठाण्यातल्या आनंदनगर चेक नाक्यावर रास्ता रोको केला. या आंदोलनामुळे ईस्टर्न एक्स्प्रेसवरील ट्रॅफीक जाम झाली. ठाण्यात विविध भागातून आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2012 09:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close