S M L

भुजबळांच्या घरासमोर 'स्वाभिमानी'चे कांदा फेक आंदोलन

12 जूननाशिकमध्ये आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या घरासमोर कांदा फेक आंदोलन केलं. कांद्याला क्विंटलमागे 200 रुपयाच्या अनुदानाची मागणीसाठी आंदोलन छेडण्यात आलंय. भुजबळ यांनी कांद्याच्या अनुदानाबद्दल लवकर निर्णय घेतला नाही तर घरावर मोर्चा नेऊ असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला होता. राजू शेट्टी यांनी मोर्चा घेऊन येऊनच दाखवावे असे जाहीर आव्हान भुजबळ यांनी दिले होते. आज स्वाभिमानी संघटनेच्या शेतकर्‍यांनी भुजबळ यांचा बंगला गाठला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी भुजबळ यांच्या बंगल्यापुढे मोठा बंदोबस्त ठेवला होता. यावेळी आंदोलकांनी भुजबळ यांच्या बंगल्यासमोरच कांदा फेकून निषेध व्यक्त केला. यावेळी 15 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 12, 2012 09:40 AM IST

12 जून

नाशिकमध्ये आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या घरासमोर कांदा फेक आंदोलन केलं. कांद्याला क्विंटलमागे 200 रुपयाच्या अनुदानाची मागणीसाठी आंदोलन छेडण्यात आलंय. भुजबळ यांनी कांद्याच्या अनुदानाबद्दल लवकर निर्णय घेतला नाही तर घरावर मोर्चा नेऊ असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला होता. राजू शेट्टी यांनी मोर्चा घेऊन येऊनच दाखवावे असे जाहीर आव्हान भुजबळ यांनी दिले होते. आज स्वाभिमानी संघटनेच्या शेतकर्‍यांनी भुजबळ यांचा बंगला गाठला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी भुजबळ यांच्या बंगल्यापुढे मोठा बंदोबस्त ठेवला होता. यावेळी आंदोलकांनी भुजबळ यांच्या बंगल्यासमोरच कांदा फेकून निषेध व्यक्त केला. यावेळी 15 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2012 09:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close