S M L

'पिशव्या साफ करण्यापेक्षा रस्ते टोलमुक्त करा'

12 जूनराज्यातील प्लॅस्टिकच्या पिशव्या साफ करण्यापेक्षा टोलनाके आणि टोलमाफियांच्या तावडीतून रस्ते मुक्त करा अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. तसेच टोलविरोधात येत्या एक ते 2 दिवसात आंदोलन करणार असल्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला. महापालिका निवडणुकीनंतर राज यांनी पहिल्यांदाच ठाण्यात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याकरता आले होते. यावेळी ते बोलत होते. राज्यात लवकरच प्लॅस्टिकच्या पिशव्या मुक्त करु अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पर्यावरण दिनी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचा समाचार घेत अगोदर राज्यातील टोल नाके आणि टोलभैरवांच्या तावडीतून रस्ते मुक्त करा असा टोला लगावला. राज्यात टोल नाक्यावरुन प्रवाशांची लूट होतेय याकडे यांचे लक्षच नाही. आला की टोल नाका भरले पैसे पण हे किती दिवस सुरु राहणार आहे. पण किती टोलवसुली झाली ? किती गाड्या गेल्यात ? अजून किती दिवस टोल सुरु राहणार याकडे कुणाचे लक्ष नाही. बांधलेल्या रस्त्याची किंमत वसुल होऊन सुध्दा टोल नाके सर्रास सुरुच आहे याबद्दल दोनच दिवसात राज्यभरात मनसेच्या वतीने आंदोलन सुरु करण्यात येणार आहे असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. तसेच पालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी काम केले नाही त्यांच्या तक्रारी राजगडावर पाठवाव्या असं कार्यकर्त्यांना राज यांनी सांगितलं. त्या बरोबर पक्षातील नासके आंबे दूर करणार असल्याचंही सूतोवाच राज ठाकरे यांनी केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 12, 2012 04:50 PM IST

'पिशव्या साफ करण्यापेक्षा रस्ते टोलमुक्त करा'

12 जून

राज्यातील प्लॅस्टिकच्या पिशव्या साफ करण्यापेक्षा टोलनाके आणि टोलमाफियांच्या तावडीतून रस्ते मुक्त करा अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. तसेच टोलविरोधात येत्या एक ते 2 दिवसात आंदोलन करणार असल्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला. महापालिका निवडणुकीनंतर राज यांनी पहिल्यांदाच ठाण्यात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याकरता आले होते. यावेळी ते बोलत होते.

राज्यात लवकरच प्लॅस्टिकच्या पिशव्या मुक्त करु अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पर्यावरण दिनी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचा समाचार घेत अगोदर राज्यातील टोल नाके आणि टोलभैरवांच्या तावडीतून रस्ते मुक्त करा असा टोला लगावला. राज्यात टोल नाक्यावरुन प्रवाशांची लूट होतेय याकडे यांचे लक्षच नाही. आला की टोल नाका भरले पैसे पण हे किती दिवस सुरु राहणार आहे. पण किती टोलवसुली झाली ? किती गाड्या गेल्यात ? अजून किती दिवस टोल सुरु राहणार याकडे कुणाचे लक्ष नाही. बांधलेल्या रस्त्याची किंमत वसुल होऊन सुध्दा टोल नाके सर्रास सुरुच आहे याबद्दल दोनच दिवसात राज्यभरात मनसेच्या वतीने आंदोलन सुरु करण्यात येणार आहे असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. तसेच पालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी काम केले नाही त्यांच्या तक्रारी राजगडावर पाठवाव्या असं कार्यकर्त्यांना राज यांनी सांगितलं. त्या बरोबर पक्षातील नासके आंबे दूर करणार असल्याचंही सूतोवाच राज ठाकरे यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2012 04:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close