S M L

डॉ.मुंडे दाम्पत्याला लवकरच अटक होण्याची शक्यता

12 जूनपरळीतील डॉ.मुंडे दाम्पत्याला आता लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. पोलिसांना या दोघांचा सुगावा लागल्याची सुत्रांनी माहिती दिलीय. परळी गर्भपात प्रकरणाची सीआयडी चौकशीला सुरुवात झाली आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली. प्रवीण फुलारी आणि संजय धुमाळ असं त्यांचं नाव आहे. डॉ. मुंडे पती-पत्नी यांना पळून जाण्यात मदत करण्याचा या दोघांवर आरोप आहे. आरोपींना आश्रय देणं, आर्थिक मदत करणं, असे गुन्हेही त्यांच्याविरोधात नोंदवण्यात आले आहेत. या दोघांकडे सापडलेल्या मोबाईलच्या कॉल रेकॉर्डनुसार चार जूनपर्यंत हे दोघंही डॉ. मुंडेच्या संपर्कात असल्याचं उघड झालंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 11, 2012 10:04 AM IST

डॉ.मुंडे दाम्पत्याला लवकरच अटक होण्याची शक्यता

12 जून

परळीतील डॉ.मुंडे दाम्पत्याला आता लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. पोलिसांना या दोघांचा सुगावा लागल्याची सुत्रांनी माहिती दिलीय. परळी गर्भपात प्रकरणाची सीआयडी चौकशीला सुरुवात झाली आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली. प्रवीण फुलारी आणि संजय धुमाळ असं त्यांचं नाव आहे. डॉ. मुंडे पती-पत्नी यांना पळून जाण्यात मदत करण्याचा या दोघांवर आरोप आहे. आरोपींना आश्रय देणं, आर्थिक मदत करणं, असे गुन्हेही त्यांच्याविरोधात नोंदवण्यात आले आहेत. या दोघांकडे सापडलेल्या मोबाईलच्या कॉल रेकॉर्डनुसार चार जूनपर्यंत हे दोघंही डॉ. मुंडेच्या संपर्कात असल्याचं उघड झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 11, 2012 10:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close