S M L

स्त्री भ्रूण हत्या गुन्हा अजामीनपत्र ?

12 जूनराज्यात स्त्रीभ्रूणहत्येचं वाढतं प्रमाण लक्षात घेता हा गुन्हा अजामीनपात्र करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. लिंगनिदान करून स्रीभू्रणहत्येचा व्यवसाय करणार्‍या डॉक्टर्सवर वचक ठेवण्यासाठी सरकार हे पाऊल उचणार आहे. अशा डॉक्टर्सना लगेचच जामीन मिळू नये, यासाठी कायद्यात कठोर तरतूद करण्याची भूमिका यामागे आहे. यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल करण्याचा प्रस्ताव महिला आणि बालकल्याण विभागाने आरोग्य विभागाकडे पाठवला आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. या संदर्भातले कायदे आरोग्य विभागाकडून केले जातात. त्यामुळे आरोग्य विभाग आणि गृह मंत्रालयाकडे विंनती करणार असल्याचंही गायकवाड यांनी म्हटलंय. स्त्रीभ्रूण हत्येविरोधात वारीच्या काळात जनजागृतीही करण्यात येणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 12, 2012 10:17 AM IST

स्त्री भ्रूण हत्या गुन्हा अजामीनपत्र ?

12 जून

राज्यात स्त्रीभ्रूणहत्येचं वाढतं प्रमाण लक्षात घेता हा गुन्हा अजामीनपात्र करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. लिंगनिदान करून स्रीभू्रणहत्येचा व्यवसाय करणार्‍या डॉक्टर्सवर वचक ठेवण्यासाठी सरकार हे पाऊल उचणार आहे. अशा डॉक्टर्सना लगेचच जामीन मिळू नये, यासाठी कायद्यात कठोर तरतूद करण्याची भूमिका यामागे आहे. यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल करण्याचा प्रस्ताव महिला आणि बालकल्याण विभागाने आरोग्य विभागाकडे पाठवला आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. या संदर्भातले कायदे आरोग्य विभागाकडून केले जातात. त्यामुळे आरोग्य विभाग आणि गृह मंत्रालयाकडे विंनती करणार असल्याचंही गायकवाड यांनी म्हटलंय. स्त्रीभ्रूण हत्येविरोधात वारीच्या काळात जनजागृतीही करण्यात येणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2012 10:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close