S M L

इंदू मिलच्या जागेसाठी रिपाइंचं रेल रोको आंदोलन

12 जूनइंदू मिलची साडेबारा एकर जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्यात दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मुंबईत रेल रोको आणि रास्ता रोको करण्यात आला. बोरीवलीत सकाळी आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी बोरीवली- चर्च गेट लोकल सुमारे 10 मिनिटं रोखून धरली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत स्टेशनचा परिसर दणाणून सोडला. यावेळी पोलिसांनी जवळपास 250 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. तर गोरेगाव वेस्टर्न हायवेवर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. जवळपास एक तास हे आंदोलन सुरु होतं. इंदू मिल जमिनीच्या प्रश्नावर आज रिपब्लिकन पक्ष (आठवले) गटाच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 11, 2012 10:21 AM IST

इंदू मिलच्या जागेसाठी रिपाइंचं रेल रोको आंदोलन

12 जून

इंदू मिलची साडेबारा एकर जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्यात दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मुंबईत रेल रोको आणि रास्ता रोको करण्यात आला. बोरीवलीत सकाळी आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी बोरीवली- चर्च गेट लोकल सुमारे 10 मिनिटं रोखून धरली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत स्टेशनचा परिसर दणाणून सोडला. यावेळी पोलिसांनी जवळपास 250 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. तर गोरेगाव वेस्टर्न हायवेवर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. जवळपास एक तास हे आंदोलन सुरु होतं. इंदू मिल जमिनीच्या प्रश्नावर आज रिपब्लिकन पक्ष (आठवले) गटाच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 11, 2012 10:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close