S M L

भीमा नदीला मळीयुक्त पाण्याचा वेढा

13 जूनमाळशिरस तालुक्यातल्या श्रीपूरच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरीचं मळीयुक्त पाणी भीमा नदाच्या पात्रात सोडण्यात येत असल्यानं चंद्रभागेचं पाणी प्रदुषित झालंय. ऐन आषाढी वारीच्या तोंडावर हे रसायनयुक्त पाणी नदीपात्रात सोडलं जात असल्यामुळे वारकर्‍यांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शेतीमहामंडळाच्या जमिनीतून हे पाणी मिरे गावच्या हद्दीत भीमेच्या पात्रात येऊन मिळतंय. भीमानदी पुढे पंढरपूरात चंद्रभागा म्हणून ओळखली जाते. शेकडो वारकरी वारीनिमित्त या भागात आल्यानंतर नदीच्या पात्रातील या प्रदूषित पाण्यामुळे या वारकर्‍यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती आहे. नदीकाठच्या गावांतील गावकर्‍यांना गेल्या कित्येक दिवसापासून या दूषित पाणी प्यावं लागतंय. येथील स्थानिक ग्रामपंचायतींनी वारंवार ठराव करूनही कारखान्यांनी ही मळीयुक्त पाणी नदीत सोडणं बंद केलं नाही. त्यामुळे भविष्यात या भागात मोठ्या प्रमाणावर आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 13, 2012 11:58 AM IST

भीमा नदीला मळीयुक्त पाण्याचा वेढा

13 जून

माळशिरस तालुक्यातल्या श्रीपूरच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरीचं मळीयुक्त पाणी भीमा नदाच्या पात्रात सोडण्यात येत असल्यानं चंद्रभागेचं पाणी प्रदुषित झालंय. ऐन आषाढी वारीच्या तोंडावर हे रसायनयुक्त पाणी नदीपात्रात सोडलं जात असल्यामुळे वारकर्‍यांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शेतीमहामंडळाच्या जमिनीतून हे पाणी मिरे गावच्या हद्दीत भीमेच्या पात्रात येऊन मिळतंय. भीमानदी पुढे पंढरपूरात चंद्रभागा म्हणून ओळखली जाते. शेकडो वारकरी वारीनिमित्त या भागात आल्यानंतर नदीच्या पात्रातील या प्रदूषित पाण्यामुळे या वारकर्‍यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती आहे. नदीकाठच्या गावांतील गावकर्‍यांना गेल्या कित्येक दिवसापासून या दूषित पाणी प्यावं लागतंय. येथील स्थानिक ग्रामपंचायतींनी वारंवार ठराव करूनही कारखान्यांनी ही मळीयुक्त पाणी नदीत सोडणं बंद केलं नाही. त्यामुळे भविष्यात या भागात मोठ्या प्रमाणावर आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 13, 2012 11:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close