S M L

नवी मुंबईत 'आदर्श'घोटाळा ?

विनय म्हात्रे, नवी मुंबई12 जूनआदर्श नंतर पुन्हा एकदा संरक्षण दलाची म्हणजेच नेव्हीची जमीन हडप करण्याचा प्रयत्न झाला आहे. तो प्रयत्न केलाय खुद्द माझगाव डॉकनं. नेव्हीची अंडरटेकिंग कंपनी असलेल्या माझगाव डॉकला 68 कोटीची जमीन फक्त 43 लाखाला मिळाली, पण ही सर्व जमीन आता माझगाव डॉक बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न करतं आहे.पनवेल रेल्वे स्टेशनच्या अगदी समोरच म्हणजे अगदी प्राईम लोकेशनवर असलेला 12 एकरचा भूखंड. 1997 साली म्हणजेच पंधरा वर्षांपूर्वी हा भूखंड माझगाव डॉकला स्टाफ क्वॉर्टरसाठी अलॉट झाला. माझगाव डॉक या नेव्हीच्या अंडरटेकिंग कंपनीला हा बारा एकरचा भूखंड मिळाला सवलतीच्या दरात, म्हणजे फक्त 55 रुपये चौरस फूट दरानं...या भूखंडाच्या बदल्यात सिडकोला 43 लाख रुपये भरणा करायचा होता पण आजपर्यंत माझगाव डॉक या कंपनीनं सिडकोकडे एक पैसाही भरलेला नाही आणि दरम्यानच्या काळात याच भूखंडाचे 15 भाग करुन ते सोसायट्यांना वाटूनही टाकले.या भूखंडावर खरंतर स्टाफ क्वार्टर्स उभारली जाणार होती पण सोसायट्यांना भूखंड वाटप करताना माझगाव डॉककडून या नियमालाही बगल देण्यात आली. हे सगळं माहित असतानाही या व्यवहाराला सिडकोनं कोणताही आक्षेप घेतला नाही. उलट माझगाव डॉक आणि सोसायट्यांसोबत ट्राय पार्टी ऍग्रीमेन्टही करण्यात आलं.या 15 सोसायट्यांनी आता खाजगी बिल्डरांशी करार केलेत. खाजगी बिल्डरांच्या जाहिरातीही माझगाव डॉक गेटबाहेर झळकायला लागलेत. 68 कोटी रुपयांची जमीन फक्त 43 लाख रुपयांत हडप करुन ती बिल्डरांच्या घशात टाकण्याचा माझगाव डॉकचा हा डाव तर आता उघड झालाय, आणि याची संपूर्ण कल्पना असताना सिडकोनं या प्रकाराकडे डोळेझाक केली.एवढा सगळा व्यवहार झाल्यावरही नेव्हीला याची कोणतीही कल्पना नाही आणि सिडकोनंही नेव्हीकडे पत्रव्यवहार करण्याचे कष्ट घेतलेले नाहीत. आता या भूखंड प्रकरणाचा चेंडू सरकारच्या कोर्टात टाकण्यात आला आहे. कर्मचार्‍यांच्या घरांसाठीचा हा भूखंड अलगद बिल्डरांच्या घशात कसा जाईल याचाच प्रयत्न आतापर्यंत झालेला आहे, आता राज्य सरकारचं नगरविकास खातं यातून कर्मचार्‍यांसाठी खरंच काही तोडगा काढणार की संरक्षण खात्याच्या या भूखंडावर नवा आदर्श उभा राहणार ते आता लवकरच कळेल.आयबीएन लोकमतचे सवाल1. आदर्शप्रमाणेच सिडको आणि माझगाव डॉकमधील दोषी अधिकार्‍यांवर कारवाई होईल का ?2. बिल्डरांच्या घशात जाणारी जमीन सिडको परत घेणार का ?3. नगरविकास खातं आता बिल्डरांच्या विरोधात निर्णय घेणार का ?

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 12, 2012 04:36 PM IST

नवी मुंबईत 'आदर्श'घोटाळा ?

विनय म्हात्रे, नवी मुंबई

12 जून

आदर्श नंतर पुन्हा एकदा संरक्षण दलाची म्हणजेच नेव्हीची जमीन हडप करण्याचा प्रयत्न झाला आहे. तो प्रयत्न केलाय खुद्द माझगाव डॉकनं. नेव्हीची अंडरटेकिंग कंपनी असलेल्या माझगाव डॉकला 68 कोटीची जमीन फक्त 43 लाखाला मिळाली, पण ही सर्व जमीन आता माझगाव डॉक बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न करतं आहे.

पनवेल रेल्वे स्टेशनच्या अगदी समोरच म्हणजे अगदी प्राईम लोकेशनवर असलेला 12 एकरचा भूखंड. 1997 साली म्हणजेच पंधरा वर्षांपूर्वी हा भूखंड माझगाव डॉकला स्टाफ क्वॉर्टरसाठी अलॉट झाला. माझगाव डॉक या नेव्हीच्या अंडरटेकिंग कंपनीला हा बारा एकरचा भूखंड मिळाला सवलतीच्या दरात, म्हणजे फक्त 55 रुपये चौरस फूट दरानं...या भूखंडाच्या बदल्यात सिडकोला 43 लाख रुपये भरणा करायचा होता पण आजपर्यंत माझगाव डॉक या कंपनीनं सिडकोकडे एक पैसाही भरलेला नाही आणि दरम्यानच्या काळात याच भूखंडाचे 15 भाग करुन ते सोसायट्यांना वाटूनही टाकले.

या भूखंडावर खरंतर स्टाफ क्वार्टर्स उभारली जाणार होती पण सोसायट्यांना भूखंड वाटप करताना माझगाव डॉककडून या नियमालाही बगल देण्यात आली. हे सगळं माहित असतानाही या व्यवहाराला सिडकोनं कोणताही आक्षेप घेतला नाही. उलट माझगाव डॉक आणि सोसायट्यांसोबत ट्राय पार्टी ऍग्रीमेन्टही करण्यात आलं.

या 15 सोसायट्यांनी आता खाजगी बिल्डरांशी करार केलेत. खाजगी बिल्डरांच्या जाहिरातीही माझगाव डॉक गेटबाहेर झळकायला लागलेत. 68 कोटी रुपयांची जमीन फक्त 43 लाख रुपयांत हडप करुन ती बिल्डरांच्या घशात टाकण्याचा माझगाव डॉकचा हा डाव तर आता उघड झालाय, आणि याची संपूर्ण कल्पना असताना सिडकोनं या प्रकाराकडे डोळेझाक केली.

एवढा सगळा व्यवहार झाल्यावरही नेव्हीला याची कोणतीही कल्पना नाही आणि सिडकोनंही नेव्हीकडे पत्रव्यवहार करण्याचे कष्ट घेतलेले नाहीत. आता या भूखंड प्रकरणाचा चेंडू सरकारच्या कोर्टात टाकण्यात आला आहे. कर्मचार्‍यांच्या घरांसाठीचा हा भूखंड अलगद बिल्डरांच्या घशात कसा जाईल याचाच प्रयत्न आतापर्यंत झालेला आहे, आता राज्य सरकारचं नगरविकास खातं यातून कर्मचार्‍यांसाठी खरंच काही तोडगा काढणार की संरक्षण खात्याच्या या भूखंडावर नवा आदर्श उभा राहणार ते आता लवकरच कळेल.

आयबीएन लोकमतचे सवाल1. आदर्शप्रमाणेच सिडको आणि माझगाव डॉकमधील दोषी अधिकार्‍यांवर कारवाई होईल का ?2. बिल्डरांच्या घशात जाणारी जमीन सिडको परत घेणार का ?3. नगरविकास खातं आता बिल्डरांच्या विरोधात निर्णय घेणार का ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2012 04:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close