S M L

'एक हॉकी दूंगा रख के'

12 जूनमुंबई पोलीस दलातील समाजसेवा शाखेचे एसीपी वसंत ढोबळे यांनी रात्री उशिरापर्यंत चालणार्‍या पब आणि बार विरोधात मोहिम सुरु केली. हुक्का पार्लर, पब यांच्या विरोधात ढोबळे यांनी कारवाई सुरु केली आहे. पण अनेकांनी याला विरोध केला आहे. सोमवारी रात्री एका पबवर ढोबळे यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी ढोबळे यांनी हॉकी स्टिक घेऊन नशेबाजांची चांगलीच नशा उतरवली होती. मात्र यावेळी ढोबळेंच रुप पाहुन काही शुध्दीवर असणार्‍यांची चांगलीच पंचाईत झाली होती. असल्या कारवाईमुळे मुंबईचं नाईट लाईफ यामुळे संपुष्टात येईल आम्हाला संस्कृती रक्षकांची गरज नाही, असा आवाज शोभा डे, प्रीतीश नंदी व इतर सेलेब्रिटीजनी उठवला. तसेच ढोबळेंच्या हॉकी स्टिकने मारण्याच्या कार्यपद्धतीवरही आक्षेप घेतला. मात्र, आपण कायद्यानुसार कारवाई करत असल्याने आपली ही कारवाई अशी पुढे सुरु राहणार असल्याचं ढोबळे यांनी सांगितलं आहे. 2011 मधील कारवाई अटक - 4500'पिटा'च्या केसेस - 80अल्पवयीन मुलींची सुटका - 650ढोबळेंची 2012 मधील कारवाई अटक - 1500 'पिटा'च्या केसेस - 36अल्पवयीन मुलींची सुटका -326

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 13, 2012 04:37 PM IST

'एक हॉकी दूंगा रख के'

12 जून

मुंबई पोलीस दलातील समाजसेवा शाखेचे एसीपी वसंत ढोबळे यांनी रात्री उशिरापर्यंत चालणार्‍या पब आणि बार विरोधात मोहिम सुरु केली. हुक्का पार्लर, पब यांच्या विरोधात ढोबळे यांनी कारवाई सुरु केली आहे. पण अनेकांनी याला विरोध केला आहे. सोमवारी रात्री एका पबवर ढोबळे यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी ढोबळे यांनी हॉकी स्टिक घेऊन नशेबाजांची चांगलीच नशा उतरवली होती. मात्र यावेळी ढोबळेंच रुप पाहुन काही शुध्दीवर असणार्‍यांची चांगलीच पंचाईत झाली होती. असल्या कारवाईमुळे मुंबईचं नाईट लाईफ यामुळे संपुष्टात येईल आम्हाला संस्कृती रक्षकांची गरज नाही, असा आवाज शोभा डे, प्रीतीश नंदी व इतर सेलेब्रिटीजनी उठवला. तसेच ढोबळेंच्या हॉकी स्टिकने मारण्याच्या कार्यपद्धतीवरही आक्षेप घेतला. मात्र, आपण कायद्यानुसार कारवाई करत असल्याने आपली ही कारवाई अशी पुढे सुरु राहणार असल्याचं ढोबळे यांनी सांगितलं आहे.

2011 मधील कारवाई अटक - 4500'पिटा'च्या केसेस - 80अल्पवयीन मुलींची सुटका - 650

ढोबळेंची 2012 मधील कारवाई अटक - 1500 'पिटा'च्या केसेस - 36अल्पवयीन मुलींची सुटका -326

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 13, 2012 04:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close