S M L

दहावीच्या निकालात कोकण विभागाची बाजी

13 जूनराज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर झाला. यंदाच्या वर्षी दहावीचा एकूण निकाल 81.32 टक्के लागला आहे. तर 93.94 टक्के निकालासह कोकण विभागानं बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ शिक्षणाचे माहेर घरं असल्याल्या पुणे शहराचा नंबर लागला आहे. पुणे विभागाचा एकूण निकाल 90.71 टक्के लागला आहे. तर तिसर्‍या स्थानावर कोल्हापूरने बाजी मारली आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल 89.17 टक्के लागला आहे. तर लातूर विभागाचा निकाल सर्वांत कमी लागला आहे. या निकालीची प्रत 22 जूनपासून संबंधीत शाळांमध्ये उपलब्ध होणार आहे. तोपर्यंत ऑनलाईन निकालाची प्रत प्रवेशासाठी ग्राह्य धरली जाणार आहे. दहावीचा निकाल विभागानूसारकोकण- 93.94 टक्केपुणे- 90.71 टक्केकोल्हापूर- 89.17 टक्केमुंबई 88.94 टक्केनाशिक 77.07नागपूर - 74.55औरंगाबाद - 71.36लातूर - 69.01 टक्केदहावीचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईटhttp://mahresult.nic.in www.msbshse.ac.in www.sscresult.mkcl.orghttp://www.rediff.com/

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 13, 2012 09:29 AM IST

दहावीच्या निकालात कोकण विभागाची बाजी

13 जून

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर झाला. यंदाच्या वर्षी दहावीचा एकूण निकाल 81.32 टक्के लागला आहे. तर 93.94 टक्के निकालासह कोकण विभागानं बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ शिक्षणाचे माहेर घरं असल्याल्या पुणे शहराचा नंबर लागला आहे. पुणे विभागाचा एकूण निकाल 90.71 टक्के लागला आहे. तर तिसर्‍या स्थानावर कोल्हापूरने बाजी मारली आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल 89.17 टक्के लागला आहे. तर लातूर विभागाचा निकाल सर्वांत कमी लागला आहे. या निकालीची प्रत 22 जूनपासून संबंधीत शाळांमध्ये उपलब्ध होणार आहे. तोपर्यंत ऑनलाईन निकालाची प्रत प्रवेशासाठी ग्राह्य धरली जाणार आहे.

दहावीचा निकाल विभागानूसार

कोकण- 93.94 टक्केपुणे- 90.71 टक्केकोल्हापूर- 89.17 टक्केमुंबई 88.94 टक्केनाशिक 77.07नागपूर - 74.55औरंगाबाद - 71.36लातूर - 69.01 टक्के

दहावीचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईटhttp://mahresult.nic.in www.msbshse.ac.in www.sscresult.mkcl.org

http://www.rediff.com/

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 13, 2012 09:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close