S M L

इचलकरंजीमध्ये काविळीमुळे 12 जणांचा बळी

14 जूनकोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये सुरु असलेल्या काविळीच्या थैमानानं आतापर्यंत 12 जणांचा बळी गेला आहे. पालिकेनं केलेल्या सर्वेक्षणात शहरात काविळीचे साडेतीन हजार रुग्ण आढळून आले आहे. खासदार राजू शेट्टी यांनी काल आरोग्य अधिकार्‍यांची आणि पालिका अधिकार्‍यंाची बैठक घेवून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. काल बुधवारी नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी के वाय चव्हाण यांचा काविळमुळे मृत्यू झाल्याच समोर आलंय. तसेच दिपाली आठमुठे या महिला डॉक्टरचाही काविळामुळे मृत्यू झालाय. शहरातील आयजीएम हॉस्पिटलमध्ये 3,190 काविळ झालेल्या रुग्णांवर उपचार सुरु आहे. दरम्यान, उपाययोजना म्हणून शहराला होणारा पंचगंगा नदीचा पाणीपुरवठा थांबवण्यात आलाय आता केवळ कृष्णा नदीचं पाणी शहरासाठी सोडण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाचं आरोग्य पथकही शहरात दाखल झालं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 14, 2012 10:22 AM IST

इचलकरंजीमध्ये काविळीमुळे 12 जणांचा बळी

14 जून

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये सुरु असलेल्या काविळीच्या थैमानानं आतापर्यंत 12 जणांचा बळी गेला आहे. पालिकेनं केलेल्या सर्वेक्षणात शहरात काविळीचे साडेतीन हजार रुग्ण आढळून आले आहे. खासदार राजू शेट्टी यांनी काल आरोग्य अधिकार्‍यांची आणि पालिका अधिकार्‍यंाची बैठक घेवून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. काल बुधवारी नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी के वाय चव्हाण यांचा काविळमुळे मृत्यू झाल्याच समोर आलंय. तसेच दिपाली आठमुठे या महिला डॉक्टरचाही काविळामुळे मृत्यू झालाय. शहरातील आयजीएम हॉस्पिटलमध्ये 3,190 काविळ झालेल्या रुग्णांवर उपचार सुरु आहे. दरम्यान, उपाययोजना म्हणून शहराला होणारा पंचगंगा नदीचा पाणीपुरवठा थांबवण्यात आलाय आता केवळ कृष्णा नदीचं पाणी शहरासाठी सोडण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाचं आरोग्य पथकही शहरात दाखल झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 14, 2012 10:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close